Home राजकारण युवक व क्रीडा विभाग काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांचे मुंबईत जंगी स्वागत.

युवक व क्रीडा विभाग काँग्रेस तर्फे राहुल गांधी यांचे मुंबईत जंगी स्वागत.

149

 

उरण दि 3(विठ्ठल ममताबादे): इंडिया आघाडीचे प्रमुख नेत्यांची बैठक मुंबई मध्ये आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक व क्रीडा विभाग काँग्रेस कडून राहुलजी गांधी यांचा स्वागत करण्यात आला.यावेळी कुस्ती पटू यांनी उपस्थिती लावली.व मोदी सरकार कुस्ती पटूवर करत असलेल्या अन्याया बद्दल खासदार राहुल गांधी याना सांगितले .राहुल जी आम्ही सारे खेळाडू तुमच्या सोबत आहोत. असे सांगत खेळाडूंनी राहुल गांधी यांना पाठिंबा दिला.महाराष्ट्र प्रदेश युवक व क्रीडा अध्यक्ष स्मिता गोरे ,रायगड जिल्हा युवक व क्रीडा अध्यक्ष आदित्य घरत ,पनवेल जिल्हा युवक व क्रीडा अध्यक्ष राकेश जाधव ,पुणे युवक व क्रीडा अध्यक्ष आशुतोष शिंदे आदी पदाधिकारी कार्यकर्ते, खेळाडू काकासाहेब पवार, हनुमंत गावडे यावेळी उपस्थित होते.