Home स्टोरी आंतरराष्ट्रीय शुटींगबॉल पंच अशोक दाभोलकर याना गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार जाहीर!

आंतरराष्ट्रीय शुटींगबॉल पंच अशोक दाभोलकर याना गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार जाहीर!

96

 

 

मसुरे प्रतिनिधी:

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जेष्ठ क्रीडा संस्कृती प्रचारक व भूतपूर्व शुटिंगबाॅल फेडरेशन पंच व स्पर्धा नियंत्रक श्री. अशोक गणेश दाभोलकर -मेस्त्री, दाभोली, वेंगुर्ला ह्याना त्यानी दिलेल्या क्रीडा, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल शिक्षण दिन व भूतपूर्व राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन ह्यांचे जन्मदिनाचे औचित्य साधून गोवा हिंदी अकादमी, गोवा व विद्यार्थी विकास अकादमी, महाराष्ट्र ह्यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा गुरूवंदना जीवनगौरव सन्मान पुरस्कार २०२३ ने गौरविण्यात येणार आहे.

०३ सप्टेंबर २०२३ रोजी छत्रपती शाहू महाराज स्मारक सभागृह, कोल्हापूर, महाराष्ट्र येथे श्री. प्रकाश वेळीप (माजी शिक्षण मंत्री, कृषी मंत्री, पंचायत मंत्री, गोवा राज्य) ह्यांचे शुभहस्ते अशोक दाभोलकर ह्यांना गौरविण्यात येणार आहे. ह्या प्रसंगी डॉ. हणमंत शिरगुप्पे ( चेअरमन- अनुराधा अर्बन निधी बॅंक, गडहिंग्लज), धनंजय महाडिक (राज्यसभा खासदार, कोल्हापूर), श्री. शंभू बांदेकर (माजी उपसभापती, गोवा), सौ. रजनीताई शिंदे ( संस्थापक अध्यक्षा- वेध फाऊंडेशन, इचलकरंजी), श्री. सुर्यकांत सावंत (उद्योजक -कणकवली),‌ श्री .अनिल मोरे, सिने अभिनेते तसेच मा. सचिव, प्रा. डॉ. बी. एन. खरात ( अध्यक्ष- विद्यार्थी विकास अकादमी) , सुनील शेट ( अध्यक्ष – गोवा हिंदी अकादमी) आदी मान्यवर मंडळी उपस्थित रहाणार आहेत.दाभोलकर याना यापूर्वी सुध्दा अनेक पुरस्कार जाहीर झाले असून त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.