Home स्टोरी मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत घडलेल्या निंदनीय प्रकाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त...

मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत घडलेल्या निंदनीय प्रकाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ आक्रमक!

139

सावंतवाडी प्रतिनिधी: मणिपूर येथे एका सैनिकाच्या पत्नी समवेत निंदनीय प्रकार घडला. त्याबाबत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघ निषेध व्यक्त करत आहे. हे कृत्य अत्यंत चुकीचे असून घटनात्मक आणि मानवी हक्काची पायमल्ली झाली आहे. आम्ही देशाच्या रक्षणासाठी प्राणपणाला लावत असताना आपण आमच्या माता-भगिनींच्या रक्षणासाठी पावले उचलावीत असे या संघाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मणिपूर येथे जो प्रकार झाला तो किळसवाना आहे. हा एक प्रकारचा गुन्हा आहे. याबाबत सखोल चौकशी होणे आवश्यक असून आरोपीवर कटरात कठोर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष तातोबा गवस, उपाध्यक्ष दीपक शिर्के, सचिव संजय सावंत, सहसचिव सरोजनी दाभोळकर, खजिनदार जगन्नाथ परब, संजय गवस, गजानन तेजा,महादेव राऊळ, शामसुंदर सावंत, महेश पालव, बाळकृष्ण चव्हाण, अनिता गवस आधी उपस्थित होते.