Home स्टोरी विद्यार्थिनींनी राबवला एक राखी जवानांसाठी उपक्रम! जि. प. पू. प्रा. शाळा...

विद्यार्थिनींनी राबवला एक राखी जवानांसाठी उपक्रम! जि. प. पू. प्रा. शाळा उभादांडा नवाबाग….

127

वेंगुर्ले प्रतिनिधी:
जि.प.पू.प्रा.शाळा उभादांडा नवाबाग, ता.वेंगुर्ला या शाळेच्या मुलींनी एक राखी जवांनासाठी हा जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा उपक्रम घेतला. आपल्या जीवाची पर्वा न करता देशसेवा करणाऱ्या या वीरांसाठी विद्यार्थीनींनी स्वतः राख्या तयार केल्या. काही माजी विद्यार्थीनींनीही राख्या दिल्यात.
आपले बांधव देशसेवेचे महान कार्य करतात.त्यांच्या या कार्याची जाणीव व्हावी. यासाठी हा उपक्रम घेण्यात आला.


यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी मा.श्रीम. सुनिता भाकरे मॅडम,शा.व्य. समिती अध्यक्ष श्री.अनंत केळुसकर, उपाध्यक्ष श्री.दत्ताराम कोळंबकर,नवाबाग शाळेच्या माजी मुख्याध्यापिका श्रीम.तन्वी रेडकर,पालक श्री.उत्तम आरावंदेकर,श्री.वसंत तांडेल, श्री.शिवानंद आरावंदेकर,श्री.नंदकिशोर मांजरेकर ,श्री.बाबुराव रेडकर, श्रीम.वैष्णवी केळुसकर, श्रीम. अक्षरा गोकरणकर, श्रीम. लक्षिका केळुसकर, श्रीम. दिप्ती तांडेल, श्रीम. पंढरी मोर्जे, श्रीम. अर्चना गिरप, श्रीम.अश्विनी केळुसकर, श्रीम.मोर्जे,श्रीम.तारी इ.उपस्थित होते. श्रीम.भाकरे मॅडम यांनी या उपक्रमाचे कौतुक केले व नव-नवीन उपक्रम राबविण्यासाठी शुभेच्छाही दिल्या.यावेळी मुख्याध्यापिका श्रीम. प्राजक्ता आपटे, शिक्षक श्री. रामा पोळजी ,श्री. मारुती गुडुळकर,श्रीम.सोनाली नागवेकर,श्रीम. स्नेहल आरावंदेकर, श्रीम.अश्विनी बागायतकर हे ही उपस्थित होते.