Home क्राईम प्राणी कल्याण अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांकडून विशेष वागणूक !

प्राणी कल्याण अधिकार्‍यांना मारहाण करणार्‍या गुन्हेगारांना पोलिसांकडून विशेष वागणूक !

106

कोल्हापूर: कत्तलीसाठी जाणार्‍या गायींची वाहतूक करणारे वाहन अडवल्याने प्राणी कल्याण अधिकारी (गोरक्षक) आशिष बारीक यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार १२ ऑगस्टला घडला होता. या प्रकरणात पेठवडगाव येथे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना कोल्हापूर शहर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात पोलिसांनी विशेष वागणूक दिल्याचा प्रकार समोर आला. या गुन्हेगारांना रुग्णालयात वैद्यकीय पडताळणीसाठी आणल्यावर पोलिसांच्या समोरच ते दूरभाषवर निवांत गप्पा मारतांना आढळून आले, तसेच मित्रांशीही गप्पा मारत होते. गोरक्षकांना मारहाण करणार्‍या गुन्हेगारांना अशी वागणूक दिल्यामुळे गोरक्षक संतप्त झाले आहेत. या प्रकरणी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पेठवडगाव पोलीस ठाण्याकडे अहवाल मागितला आहे.