Home क्राईम श्रीरामजन्मभूमीवर जिहादी आतंकवादाचे संकट !

श्रीरामजन्मभूमीवर जिहादी आतंकवादाचे संकट !

51

उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाने आतापर्यंत ७ जिल्ह्यांतून १५ आतंकवाद्यांना केली अटक !
उत्तरप्रदेश: जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित लोक सहभागी होणार आहेत. अशातच अयोध्येच्या आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये पाकची गुप्तचर संघटना ‘आय.एस्.आय.’चे हस्तक, आतंकवादी आणि ‘स्लीपर सेल्स’ (छुप्या पद्धतीने आतंकवाद्यांना साहाय्य करणारे धर्मांधांचे स्थानिक गट) यांना सातत्याने अटक होत आहे.

१. श्रीरामजन्मभूमीचा निकाल लागल्यानंतर ऑगस्ट २०२० मध्ये बलरामपूरमधून एका आतंकवाद्याला, फेब्रुवारी-जुलै आणि सप्टेंबर २०२१ मध्ये लक्ष्मणपुरीमधून ४ आतंकवादी, सप्टेंबर २०२१ मध्ये प्रयागराज, रायबरेली अन् बहराइचमधून ३ आतंकवादी आणि गोरखपूरमधून एप्रिल २०२२ मध्ये एका आतंकवाद्याला अटक करण्यात आली होती.

२. आता नव्याने वर्ष २०२३ मध्ये उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाने २ जुलै या दिवशी गोंडा येथून सद्दाम, १ ऑगस्टला मुकीम, १६ जुलै या दिवशी रईस, तर १८ जुलैला सलमान आणि अरमान या ‘आय.एस्.आय.’चे हस्तक आणि आतंकवादी यांना अटक केली. या प्रकरणी ६ जुलै या दिवशी तारिक नावाच्या व्यक्तीलाही गोरखपूरमधून अटक करण्यात आली होती.

३. या सर्व प्रकरणांमध्ये ‘बाबरी ढाच्या’च्या नावाने आतंकवाद्यांना भडकावण्यात आल्याचे आतंकवादविरोधी पथकाच्या प्राथमिक अन्वेषणातून समोर आले आहे. सर्वांना ‘स्लीपर सेल’सारखे प्रशिक्षण देण्यात आले होते आणि आदेश मिळाल्यानंतर ते कार्यान्वित होणार होते.

४. उत्तरप्रदेश राज्य आतंकवादविरोधी पथकाच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले की, बाबरी ढाचा पाडल्याचे सांगत या सर्वांना भडकावण्यात आले. बाबरी पाडल्याचा सूड घेणे, हे या लोकांचे ध्येय होते. अयोध्येजवळ या सर्वांची उपस्थिती काही आतंकवादी कारस्थानाकडेही बोट दाखवत आहे.

५. अधिकार्‍याने पुढे स्पष्ट केले की, बाबरी पाडल्यानंतर अयोध्येतील सुरक्षाव्यवस्था उत्तरप्रदेशातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक कडक आहे. अयोध्या हे आतंकवादी संघटनांचे लक्ष्य असू शकते, ते शेजारील गोंडा, बलरामपूर, बहराइच, बाराबंकी, गोरखपूर आणि आंबेडकरनगर या जिल्ह्यांमध्ये घुसखोरी करत आहेत. आतंकवादी संघटनांचे ‘स्लीपर सेल’ येथे रहात आहेत. वर्ष २०१९ पासून येथे सातत्याने ‘आय.एस्.आय.’चे दलाल सापडत आहेत.

६. अधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार आय.एस्.आय. आणि आतंकवादी संघटना यांचे लक्ष्य जानेवारी २०२४ मध्ये अयोध्येत होणारा कार्यक्रम हासुद्धा आहे.