Home स्टोरी शंकर पुतळा ते पाटकर बागेपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था….

शंकर पुतळा ते पाटकर बागेपर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था….

140

दोडामार्ग प्रतिनिधी : आत्माराम परब NH 66 लागुन शंकर पुतळा ते पाटकर बागे पर्यंतचा रस्ता खूपच खराब झालेला आहे. या रस्त्याची अति दुरवस्था झालेली आहे आणि ती कित्येक वर्षे तशीचआहे .

या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि सरकार कडे वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन आणि सरकार काडून दुर्लक्ष होत आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांचे आणि विशेषतः पादचारी शाळेतील मुले आणि वयोवृद्ध लोकांचे खूपच हाल होत आहेत. सर्व प्रकारची वाहने सतत येत जात असल्यामुळे संबंधित रस्त्याची आणखीनच दुरावस्था होऊन रस्ता सामान्य नागरिकांसाठी खूप त्रासदायक होत आहे. तरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावा अशी विनंती करीत जेष्ठ शिवसैनिक आणि समाजसेवक श्री अशोक परब यांनी केली आहे.