सिंधुदुर्ग प्रतिनिधी:
देशात आणि जगभरात भारताच्या स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना सिंधू रनर्स टीम कडून सावंतवाडी १२ तास रनच्या रूपाने अनोखी मानवंदना देण्यात आली. सिंधुदुर्ग जिल्यातील होतकरू आणि क्रीडा प्रेमी तरुणांना स्वतःचे कौशल्य दाखवण्यासाठी आणि राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर पोहचलेल्या खेळाडूंकडून अधिकाधिक ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी स्वतःचे व्यासपीठ मिळावे म्हणून सिंधू रनर्सटीम ने सावंतवाडी ६ तास आणि १२ तास रनची संकल्पना राबवली.
सिंधुदुर्ग जिल्यात एवढीमोढी रन आयोजन करण्याचीहि दुसरी वेळ होती. सिंधू रनर्स चे टीम मेंबर्स ओंकार पराडकर, डॉ. स्नेहल गोवेकर, प्रसाद कोरगांवकर, डॉ. प्रशांत माधव, निलेश मलिक, भूषण बान्देलकर, आकाश पार्सेकर आणि इतर टीम जवळपास २ ते ३ महिने हा इव्हेंट नीट पार पडावा म्हणून लागणाऱ्या परवानग्या घेणे, टी-शर्ट, सन्मानचिंन्ह, हैड्रेशन सपोर्ट अश्या बऱ्याच गोष्टीची जुळवाजुळव करत होते. बाहेर गावाहून येणाऱ्या आपल्या रनरमित्रांची नीट व्यवस्था आणि योग्य पाहुणचार व्हावा यासाठी सिंधू रनर टीमने विशेष खबरदारी घेतली.
या रन मध्ये जिल्यातील आणि जिल्ह्याबाहेरील तब्बल ३५ धावकांनी सहभाग नोंदविला. या अभिनव उपक्रमाला सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांचा महत्वपूर्ण पाठिंबा लाभला. हि रन १३ ऑगस्ट २०२३ रोजी सावंतवाडीच्या ऐतिहासिक वारसा असलेल्या राजवाडा येथून सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले आणि इतर मान्यवारांच्या उपस्थित सकाळी ५ वाजता सुरु झाली.
राजवाड्यातून सुरवात होऊन पुढे सावंतवाडी मोती तलावाला ३ चक्कर मारून रनर गवळी तिठा मार्गे देव उपरलकर जवळ पोहोचल्यावर श्री देव उपरलकर सावंतवाडीतील ३६५ खेड्यांचा रखवालदार त्याच्या चरणी पूजा करून सर्व धावक भर पावसात बुर्डी पुलाकडून कोलगाव निरूखेवाडीला (रेस रूट) कडे निघाले.
सर्व रनर च्या एक मताने हैड्रेशन आणि फूड आयोजन केले होते (केळी, मोसंबी, उकडलेले बटाटे, रताळी, खजूर, कोकण सरबत, पाणी आणि बरेच काही). सकाळी पाऊस थांबल्या नंतर १० च्या सुमारास नास्ता म्हणून पोहे देण्यात आले. तो पर्यंत ऊन पाऊसाचा खेळ चालू होता पण नंतर मात्र कडक ऊन चालू झाले आणि रनरची खरी कसोटी लागायला सुरवात झाली. सिंधू रनर टीमच्या मदतीला भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे तज्ज्ञ डॉक्टर्स ची टीम आणि फिसिओ सपोर्टला ब्यारिस्टर नाथापै फिजीओथेरपि कॉलेज ची टीम पण होती. या टीमने वेळोवेळी रनर ला मेडिकल चेकअप आणि फिजीओथेरपि सपोर्ट देऊन पुढील रन करण्यास मोलाचा हातभार लावला.
सिंधुदुर्ग जिल्यातील काही नावाजलेल्या डॉक्टर्सनी रन मध्ये सहभाग नोंदविला व सिंधू रनर च्या आयोजनाबद्दल भरभरून शुभेच्या दिल्या. याच दरम्यान काही छोट्या धावकांनी पण २ ते ३ किलोमीटर ची तिरंग्या सोबत रन केली. स्वरदा पराडकर, अमोघ पराडकर, तन्वी पराडकर, शुभ्रा रेडकर, श्रावणी रेडकर, अधिश गोवेकर, उधृत गोवेकर, शिवांश पानसे या छोट्या धावकांनी सगळ्या रनर ची मनेजिंकली. या छोट्या धावकांना युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान करण्यात आला.
जशी वेळ संपत जात होती तशी धावकांची दमछाक पण होत होती पण जास्तीत जास्त किलोमीटर पूर्ण करणार या ध्येयाने झपाटलेले धावक सतत पळत होते. संध्याकाळी ठीक ४ वाजता कोलगाव निरूखेवाडीहुन सर्व धावक सावंतवाडी राजवाड्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला लागले. सावंतवाडीत पोचल्यावर मोतीतलावाल अजून काही चक्कर मारून राजवाड्यात रनची सांगता ठीक ५:३० ला करण्यात आली. सांगायला आनंद होतो कि सहभागी ३० धावकांनी तब्बल १२०० किलोमीटर अंतर १२ तासात पार केले. रन पूर्ण झाल्यावर कोकणातील एक खास पदार्थ (पातोळ्या) धावकांना अल्पोपहार म्हणून देण्यात आला.
या इव्हेंटचा मनचिंन्ह प्रदान सोहळा राजवाडा येथे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले, भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. काठाने, हुमान राईट्स अससोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष्य संतोष नाईक, दैनिक कोकण साद मुख्य संपादक देवयानी वरस्कर, सिंधुदुर्ग जिल्हा एथलेटिकस फेडरेशन असोसिएशन अध्यक्ष रणजितसिंह राणे, हुमान राईट्स अससोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा सचिव अर्जुन परब, हुमान राईट्स अससोसिएशन मालवण तालुका सचिव राजेश लब्दे आणि हुमान राईट्स अससोसिएशन सिंधुदुर्ग जिल्हा जनसंपर्क अधिकारी रोहित हडकर, सुधीर पराडकर, विनायक पराडकर आणि इतर मान्यवारांच्या उपस्थित पार पडला. प्रत्येक धवकाला सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
त्यावेळी उपस्थित मान्यवारांनी या अभिनव उपक्रमामुळे आपल्या जिल्ह्याला आणि देशाला जागतिक पातळीवर नेणारे धावक तयार होतील अशी अशा व्यक्त केली आणि सिंधू रनर टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
या रन मध्ये महिलांनी पण विशेष कामगिरी केली, मुंबईच्या डॉ. शर्वरी खेर यांनी तब्बल १२ तासात ७५ किलोमीटर्स तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रसिक परब आणि नम्रता कोकरे यांनी ६ तासात ४२ किलोमीटर अंतर पार केले आणि जिल्ह्यातून ६ तास रन करणाऱ्या पहिल्या महिला होण्याचा मान पटकावला तर पांडुरंग कदम ने ६ तासात ५७ किलोमीटर अंतर पार केले आणि फ्रँकी गोम्स याने १२ तासात तब्बल ८८ किलोमीटर्स अंतर पार करून २०२१ मधील ८४ किलोमीटर चा रेकॉर्ड ब्रेक करून नवीन रेकॉर्ड बनवले.
.
यातील धावकांची नावे आणि किलोमीटर्स खालील प्रमाणे.
फ्रँकी गोम्स : १२ तास : ८८ किलोमीटर्स
संतोष गायकवाड : १२ तास : ८२ किलोमीटर्स
ऋषिकेश लवाटे : १२ तास : ७६ किलोमीटर्स
महेश शेटकर : १२ तास : ७० किलोमीटर्स
अद्वैत प्रभुदेसाई : १२ तास : ६६ किलोमीटर्स
चंद्रकांत पाटील : १२ तास : ६४ किलोमीटर्स
भूषण पराडकर : १२ तास : ६३ किलोमीटर्स
विनायक पाटील : १२ तास : ६३ किलोमीटर्स
डॉ. प्रशांत कामात : १२ तास : ५० किलोमीटर्स
डॉ. शर्वरी खेर : १२ तास : ७५ किलोमीटर्स
अमृता पानसे : १२ तास : ५५ किलोमीटर्स
पांडुरंग कदम : ६ तास : ५७ किलोमीटर्स
मेघराज कोकरे : ६ तास : ५५ किलोमीटर्स
भावेश कुमार : ६ तास : ४४ किलोमीटर्स
अजित पाटील : ६ तास : ४० किलोमीटर्स
आदित्य मोहिते : ६ तास : ४० किलोमीटर्स
सर्वेश मांडेकर : ६ तास : ४० किलोमीटर्स
रॉबर्ट वाझ : ६ तास : ३९ किलोमीटर्स
संग्राम गावडे : ६ तास : ३५ किलोमीटर्स
प्रज्योत राणे : ६ तास : 32 किलोमीटर्स
उदय पाटील : ६ तास : ३० किलोमीटर्स
रसिक परब : ६ तास : ४० किलोमीटर्स
नम्रता कोकरे : ६ तास : ४० किलोमीटर्स
शालिनी वाझ : ६ तास : ३९ किलोमीटर्स
मुसरद जिद्दी : ६ तास : ३३ किलोमीटर्स
या उपक्रमात केलेल्या सकार्याबद्दल खालील नमूद केलेल्या व्यक्ती आणि संघटनांचे मी आभार मानतो.
सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे आणि युवाराज्ञी सौ. श्रद्धाराजे भोसले
भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय सावंतवाडीचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब पाटील
फिसिओ सपोर्टला ब्यारिस्टर नाथापै फिजीओथेरपि कॉलेज कुडाळ
सागर साळुंखे (मुख्याधिकारी सावंतवाडी नगरपरिषद)
देवयानी वारस्कार कोकण साद लाईव्ह आणि दैनिक कोकण सादचे मुख्य संपादक
करण नाईक फोटोशूट
हॉटेल मालवणी डेज
हॉटेल बरो रव (हितेन नाईक आणि नरेंद्र सावंत )
सदा स्पोर्ट्स (सदानंद धुरी)
ओंकार नवरात्र मंडळ (कोलगाव निरूखेवाडी)
सिंधुदुर्ग जिल्हा मेडिकल अससोसिएशन
अर्पण मेडिकल ( रामा गावडे)
वक्रतुंड स्पोर्ट्स (टी-शर्ट प्रिंटिंग)
आकार प्रिंटर कुडाळ (ट्रॉफी प्रिंट)
ओंकार प्रॉडक्ट्स माजगाव
महिला बचत गट बॉर्देवाडी भोईंचे केरीवडे कुडाळ
धावणे या व्ययाम प्रकारा बद्दल जनसामान्यात जागृती करून आपल्या जिल्यात व राज्यात देशाचे नेतृत्व करणारे धावपटू तयार करणे हेच या मागचे उद्धिष्ट आहे.