Home स्टोरी चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

चंद्राच्या अधिक निकट पोचले भारताचे ऐतिहासिक ‘चंद्रयान-३’ !

111

१५ ऑगस्ट वार्ता: चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्राच्या अधिक निकट पोचले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच ‘इस्रो’ने १४ ऑगस्टच्या सकाळी ११.३० ते १२.३० या कालावधीत ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर आणखी घटवले. त्यामुळे आता चंद्रयान-३ चंद्राला किमान १५० किमी ते अधिकाधिक १७७ किमी अंतरावरून प्रदक्षिणा घालत आहे.याआधी ६ आणि ९ ऑगस्ट या दिवशी अशा प्रकारेच चंद्रयान-३ चे चंद्रापासूनचे अंतर अल्प करण्यात आले होते. २३ ऑगस्ट या दिवशी चंद्रयान-३ चंद्रावर उतरण्याचा (‘सॉफ्ट लँडिंग’चा) प्रयत्न करणार आहे. १६ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे चंद्रापासूनचे अंतर १०० किमी करण्यात येणार असून १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे.