Home स्टोरी भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा...

भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरेत माजी सैनिक आणि त्यांच्या विर पत्नीचा अनोखा सन्मान….

265

 

 

मसुरे प्रतिनिधी:

देशाचे रक्षण हाच सैनिकाचा आत्मा असतो आणि देश रक्षणासाठी सैनिक जीवाचे बाजी लावत असतो आमच्यासारख्या सैनिकांना देश सेवा करायची संधी मिळाली हे आम्ही आमचं भाग्य समजतो. मसुरे येथील भरतगड ग्राहक सहकारी संस्थेने आम्हा माजी सैनिकांचा जो आज मान सन्मान केलात याबद्दल या संस्थेच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक करावे तेवढेच थोडे आहे असे प्रतिपादन मसुरे येथील माजी सैनिक दीपक बागवे यांनी सत्कारास उत्तर देताना मसुरे येथे केले .

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा च्या समारोपाचे अवचित्य साधून मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत मसुरे येथील भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने मसुरे येथील माजी सैनिक आणि शहीद सैनिकांच्या वीर पत्नींचा गौरव समारंभ या संस्थेचे अध्यक्ष अजयकुमार प्रभू गावकर यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावरती मरडे सरपंच संदीप हडकर, माजी जी प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, माझी सैनिक धनंजय सावंत अशोक मोरे दीपक बागवे, वीर पत्नी श्रीमती कल्पना दूखंडे, प्रकाश चव्हाण, रवींद्र दूखंडे, महेश दुखंडे,विलास राणे, सोमाजी परब, पुरुषोत्तम शिंगरे, जगदीश चव्हाण, दिगंबर एसजी, वासुदेव पाटील, नितीन नाईक, वीरेश तोंडवळकर, बटल्या भोगले, मोनिका दूखंडे, हेमलता दूखंडे, श्री.किशोर देऊलकर, शकिरा शेख, रघुनाथ ठाकूर, सुलक्षणा परब, वसंत प्रभूगावकर, तात्या हिंदळेकर, प्रकाश मोरे, सुरेश बागवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी सैनिक दीपक बागवे धनजय सावंत, अशोक मोरे यांचा आणि माजी सैनिक कै.मोहन दूखंडे यांच्या वीरपत्नी कल्पना दूखंडे, कै.बिबीशन चव्हाण यांचे बंधू प्रकाश चव्हाण, कै. नारायण गावडे यांचे जावई संदीप हडकर, कै. बाबुराव राणे यांचे चिरंजीव विलास राणे, पुणे येथे असलेले मसुरे सुपुत्र माजी सैनिक श्री रवींद्र दूखंडे यांचे बंधू महेश दुखंडे यांचा या वेळी मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी माजी सैनिक अशोक मोरे, दीपक बागवे, धनंजय सावंत यांनी जीवाची बाजी लावून देशासाठी लढताना प्रत्यक्ष युद्धभूमीवरील अनेक थरारक प्रसंग उपस्थित ग्रामस्थांना सांगताना प्रत्येक श्रोत्याच्या चेहऱ्यावरती आनंदाश्रू आलेत. माजी सैनिक अशोक मोरे यांनी युद्धभूमीवर आपल्याला शत्रूची गोळी लागलेली असतानाही प्राणपणाने लढताना आपण आपल्या मायभूमीसाठी लढत आहोत याचाच आपल्याला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी सत्कारास उत्तर देताना सांगितले. माझी जि प अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर, मर्डे सरपंच संदीप हडकर आणि या संस्थेचे अध्यक्ष अजयकुमार प्रभूगावकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या वतीने यावेळी येथील महिलांना दीप वाटण्यात आलेत.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश बागवे आणि आभार सोमाजी परब यांनी मानले.

 

फोटो:

मसुरे येथे भरतगड ग्राहक सहकारी संस्थेच्या वतीने येथील माजी सैनिक आणि वीर पत्नींचा आणि परिवाराचा गौरव करताना अजयकुमार प्रभू गावकर, सरपंच संदीप हडकर, माझी जिप अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर आणि मान्यवर ….