Home क्राईम नागपूर येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्‍या तलाठ्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडण्‍याचा प्रयत्न !

नागपूर येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्‍या तलाठ्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडण्‍याचा प्रयत्न !

122

नागपूर: येथे वाळूची अवैध वाहतूक रोखणार्‍या एका तलाठ्याला ट्रॅक्‍टरखाली चिरडण्‍याचा प्रयत्न करण्‍यात आला. भंडारा जिल्‍ह्यातील पवनी तालुक्‍यातील सातखेडा येथे ११ ऑगस्‍टच्‍या रात्री ही घटना घडली आहे. किरण मोरे (वय ३५ वर्षे) असे घायाळ झालेल्‍या तलाठ्याचे नाव आहे. त्‍यांच्‍यावर रुग्‍णालयात उपचार चालू आहेत.

 

पवनी तालुक्‍यात वाळूची अवैध तस्‍करी चालू असल्‍याची माहिती प्रशासनाला मिळाल्‍यावर तहसील कार्यालयाचे १ नायब तहसीलदार आणि २ तलाठी यांचे एक भरारी पथक त्‍या भागात गेले होते. पथकाने वाळूची अवैध वाहतूक करणार्‍या एका ट्रॅक्‍टरला रोखले. अचानक ट्रॅक्‍टरचालक आणि मालक यांनी किरण मोरे यांच्‍या अंगावर ट्रॅक्‍टर घालण्‍याचा प्रयत्न केला. त्‍यात मोरे गंभीर घायाळ झाले. पोलिसांनी या प्रकरणी ट्रॅक्‍टर कह्यात घेतला आहे, तर ट्रॅक्‍टरमालक पंकज काटेखाये आणि चालक आशिष काटेखाये अद्याप पसार आहेत.