Home शिक्षण महसूल विभाग तलाठी पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर

महसूल विभाग तलाठी पदभरती परीक्षेच्या तारखा जाहीर

175

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने, महसूल विभागांतर्गत तलाठी पदभरतीची घोषणा करण्यात आली असून, या पदभरतीसाठी आवश्यक परीक्षेच्या तारखांची घोषणा शासनाच्यावतीने करण्यात आली आहे. TCS च्या वतीने ही परीक्षा घेतली जाणार असून, 19 दिवसांच्या कालावधीत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत तलाठी (गट-क) संवर्गातील एकूण 4344 पदांच्या भरतीसाठी जमावबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य), पुणे कार्यालय यांच्याकडून राज्यभरातील 36 जिल्ह्यांमधील विविध केंद्रांवर ऑनलाइन परीक्षा (Computer Based Test) घेण्यात येणार आहे.तलाठी भरती परीक्षेसाठी TCS कंपनीच्यावतीने तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत. या भरतीसाठी आवश्यक असणारी ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 19 दिवस असून, ही परीक्षा 3 सत्रांमध्ये घेतली जाणार आहे.

परीक्षेच्या नियोजित तारखा खालील प्रमाणे.
17 ऑगस्ट 2023 ते 22ऑगस्ट 2023
26 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2023
31ऑगस्ट 2023 आणि 1 सप्टेंबर 2023
4 सप्टेंबर 2023 ते 6 सप्टेंबर 2023

सर्व तारखांना सत्राची वेळ
सत्र 1 : सकाळी 9.00 ते 11.00
सत्र 2 : दुपारी 12.30 ते 2.30
सत्र 3 : सायंकाळी 4.30 ते 6.30