Home स्टोरी पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून...

पुण्यात हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करवून घेणार्‍या मुसलमानाला अटक !

255

२ हजार मुलींना ‘लव्ह जिहाद’मध्ये बळी पाडण्याचे षड्यंत्र उघड !


सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेणार्‍या हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून अमली पदार्थांची विक्री करून घेत असल्याचे प्रकरण नुकतेच उघड झाले आहे. या प्रकरणी हिंदु पीडितेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी आयान या धर्मांधाला टिंगरेनगरमधून अटक केली आहे. यात आयान आणि त्याचा मोठा भाऊ बिलाल इनामदार, तसेच संपूर्ण कुटुंब सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या धर्मांधांनी २ हजार मुलींना लव्ह जिहादमध्ये अडकवण्याचा कट रचल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून दोषींना (धर्मांधांना) फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी पीडितेच्या कटुंबाकडून करण्यात आली आहे.

बिलाल याचे अमली पदार्थ विक्रीचे मोठे जाळे असून तोच यातील मुख्य सूत्रधार आहे. आयान हा हिंदु मुलींना आमीष दाखवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढायचा. आयान याने हातावर त्रिशूळ गोंदवले होते, तसेच तो गळ्यात रुद्राक्ष घालायचा. त्याने त्याची खरी ओळख लपवून तो हिंदु असल्याचे भासवून हिंदु मुलींची फसवणूक करत होता. बिलाल आणि आयान फसवलेल्या मुलींना बळजोरीने विविध ठिकाणी अमली पदार्थांची विक्री करण्यास भाग पाडायचा. पुणे येथील कोरेगाव पार्कमधील काही ‘पब’मध्ये पीडित हिंदु मुलींच्या माध्यमातून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे.