Home स्टोरी राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा! डाकघर अधीक्षक मयुरेश कोले.

राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा! डाकघर अधीक्षक मयुरेश कोले.

136

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारत सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहिमेत सक्रीय भूमिका बजावत सर्व नागरिकांनी टपाल कार्यालयातून दि. १३ दिवशी पासून राष्ट्रध्वज घेऊन घरोघरी फडकवावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक मयुरेश कोले यांनी केले आहे.मागील वर्षीप्रमाणे याहीवर्षी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत देशभक्तीची भावना जागृत व्हावी, या उद्देशानें भारत सरकार हा स्वातंत्र्यदिन उत्सवाच्या रुपात साजरा करण्यासाठी घराघरात तिरंगा मोहीम राबवित आहे. यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये नागरिकांना राष्ट्रध्वज सहज व सोईस्करपणे उपलब्ध करून देण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग विभागातील सर्व पोस्ट कार्यालयांमध्ये ध्वज विक्री सुरू राहील. तेथून कोणताही नागरिक कार्यालयीन वेळेत राष्ट्रध्वज मिळवू शकतो आणि तो त्याच्या घरी फडकवू शकतो. त्याचबरोबर जिल्हयामध्ये मालवण व सावंतवाडी हेड पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रध्वज खरेदी करणाऱ्यांसाठी सेल्फी पॉईंटही बनविण्यात आले असून त्याचाही लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.