Home क्राईम मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपचे नेते अनुज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे भाजपचे नेते अनुज चौधरी यांची गोळ्या झाडून हत्या !

142

उत्तरप्रदेश: भाजपचे नेते अनुज चौधरी (३५ वर्षे) यांची १० ऑगस्ट २०२३ या दिवशी येथील पार्श्‍वनाथ प्रतिभा सोसायटीत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांना सुरक्षा पुरवण्यासाठी संभळ पोलिसांनी एक सुरक्षारक्षक नियुक्त केला होता. तसेच अनुज चौधरी यांनी २ खाजगी सुरक्षारक्षकही ठेवले होते. नेहमीप्रमाणे अनुज चौधरी त्यांच्या मित्रासोबत सोसायटीत फिरत होते. ते गेटवर पोचले असता समोरच्या रस्त्यावरून दुचाकीवर ३ गुंड आले आणि तिघांनी चौधरी यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. डोक्यात, पाठीला आणि खांद्यावर गोळी लागल्याने अनुज चौधरी जागीच ठार झाले. पोलिसांनी अनुज चौधरी यांना रुग्णालयात नेले; मात्र तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधीक्षक अखिलेश भदौरिया यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.