सावंतवाडी प्रतिनिधी: १० ऑगस्ट.
शिरशिंगे गोठवेवाडी येथील डोंगरावर भेगा पडल्या असल्याने आमचे पुनर्वसन करा अशी मागणी ९३ लोकांनी केली आहे. तहसीलदार श्रीधर पाटील यांना आज निवेदन दिले. तहसीलदार श्री. पाटील म्हणाले, भुगर्भशास्त्रज्ञा मार्फत सर्वेक्षण करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पुनर्वसनाबाबत निर्णय घेईल. त्यासाठी पाठपुरावा केला जाईल.तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन दिले आहे. शिरशिंगे गोठवाडी येथे डोंगराळ भागात लोकवस्ती असून येथील दरवर्षी पावसाळ्याच्या दरम्यान डोंगर खचणे, जमिनीला भेगा पडणे, लहान दरडी कोसळणे असे प्रकार होऊन येथील जिवीतहानी व वस्तीवरील घरांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शासनस्तरावरून दरवर्षी संबंधीत भागात राहणा-या कुटुंबांना नोटीसा देणे, कींवा सुचना देण्यात येतात.
सदर भागात भुस्खलनाची घटना दि. ६ ऑगस्ट २०१९ रोजी झाली होती. याला आज पाच वर्ष पूर्ण झाली. शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करूनही अद्याप शासनाकडुन कोणतीही कार्यवाही झालेली नाही.या बाबत दि.३० जून २०२२ रोजी संबंधीत दरडप्रवण क्षेत्रातील लोकांचे पुर्नवसन करण्याबाबत तहसिलदार यांना निवेदन सादर करण्यात आले होते. त्याचा शासन स्तरावरून अद्याप कोणतेही कारवाही झालेली नाही. त्यास अनुसरून संबंधीत भागात राहणा-या लोकांचे योग्य ठिकाणी पुर्नवसन – स्थालांतरण करण्यात यावे. अशी संबधीत लोकाची मागणी आहे, या निवेदनात म्हटले आहे.
सदर पुर्नवसनासाठी लागणारी जागा गावाच्या हददीत सर्वे नं २७/१ (सामाईक) मध्ये तीन ने चार ठिकाणी उपलब्ध आहे. त्या जागेची शासन स्तरावरून पाहणी करून संपादनाबाबत कार्यवाही करून बाधीत कुटुंबांचे तात्काळ पुर्नवसन करण्यात यावे.सदर निवेदनावर तात्काळ कारवाई न झाल्यास होणा-या मनुष्य व वित्त हानीस सर्वस्वी जबाबदार शासन राहील याची नोंद घ्यावी, असे या निवेदनात म्हटले आहे. आज शिरशिंगे सरपंच दिपक राऊळ, माजी सरपंच नारायण राऊळ, सुरेश शिर्के, जीवन लाड, उत्तम शिर्के, प्रभाकर घावरे, सिताराम सुर्वे, अनंत शिर्के, वसंत घावरे, प्रशांत देसाई, दिपक शिर्के,भिवा शिर्के, गणू उपस्थित होते. तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, भूजल सर्वेक्षण आणि पुनर्वसन बाबतीत पाठपुरावा केला जाईल.