Home स्टोरी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने आझाद मैदान येथे...

उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने आझाद मैदान येथे आंदोलन!

287

२६ जुलै वार्ता: उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना यांच्यावतीने आझाद मैदान मुंबई येथे आपल्या विविध मागण्यांकरिता आंदोलन छेडले होते. या आंदोलनात ग्राम विकास संघटनेच्या सर्व मागण्या मान्य करत असल्याचे सांगितले. यामध्ये सर्व सीआरपी ताईंची मानधन वाढ, कर्मचाऱ्यांची मानधन वाढ, प्रत्येक गावामध्ये नवीन सीआरपी निवड, कर्मचाऱ्यांची आंतरजिल्हा बदली अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या.

चार दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये निर्णयाला मंजुरी घेऊन निर्णय जाहीर करू व एक ऑगस्ट पासून हे निर्णय लागू करू”,असे मंत्री गिरीश महाजन यांनी उपस्थित लाखो महिलांना सांगितले. मुंबई आझाद मैदान येथे मुसळधार पाऊस पडत असतानाही संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो महिला व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आझाद मैदानही कमी पडू लागले होते एवढी मोठ्या सख्येने महिला उपस्थित होत्या. मंत्री महाजन यांनी रात्री दिलेल्या आश्वासनानंतर आझाद मैदानावर चालू असलेले उपोषण व भव्य मोर्चा उमेदकडून स्थगित करण्यात आला.