Home स्टोरी सावंतवाडी जिल्हा कारागृहांतील १४ बंदी यांना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन...

सावंतवाडी जिल्हा कारागृहांतील १४ बंदी यांना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वाटप.

60

सावंतवाडी प्रतिनिधी: माननीय अप्पर पोलीस महासंचालक श्री सुहास वारके साहेब,माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक श्री सुपेकर साहेब व माननीय कारागृह महानिरीक्षक दक्षिण विभाग श्री देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रेरणेने सावंतवाडी जिल्हा कारागृहांमध्ये आर.सि.टी. कुडाळ व बँक ऑफ इंडिया कुडाळ यांचे संयुक्त विद्यमानाने कारागृहातील १४ बंदी यांना मेणबत्ती व अगरबत्ती बनवण्याचे प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. सदरचा प्रशिक्षण यशस्वीरित्या राबवणे कामी बँक ऑफ इंडिया चे मॅनेजर श्री मेश्राम सर आर सिटी कार्यालयाचे श्री किशोर राठी सर व त्यांचे प्रशिक्षक यांचे सहकार्याने मेणबत्ती व अगरबत्ती प्रशिक्षण यशस्वीरित्या राबवणे शक्य झाले आहे. सदर कार्यक्रम कारागृहामध्ये यशस्वीरित्या राबवणे कामे श्री सतीश कांबळे कारागृह अधीक्षक, श्री संदीप एक शिंगे वरिष्ठ तुरुंगाधिकारी व श्री संजय मयेकर तुरुंगाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर अधीक्षक सतीश कांबळे यांनी सदर प्रशिक्षणाचा कारागृहातून मुक्त झाल्यानंतर फायदा होणार असल्याचे सांगितले तसेच त्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी बँक ऑफ इंडिया कडून लोन प्राप्त होणार आहे त्यामुळे कारागृहाचे ब्रीदवाक्य असलेले सुधारणा व पुनर्वसन हे सार्थकी ठरणार आहे.