Home स्टोरी कलंबिस्त तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दिनेश सावंत..! १५ सदस्य समिती गठीत.

कलंबिस्त तंटामुक्त समिती अध्यक्षपदी दिनेश सावंत..! १५ सदस्य समिती गठीत.

139

सावंतवाडी प्रतिनिधी: कलंबिस्त गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी उद्धव बाळासाहेब ठाकरे युवा सेने चे विभाग प्रमुख दिनेश सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. एकूण १५ सदस्य संख्या असलेली ही समिती गावातील तंटा वाद-विवाद मिटवणे आधी उपक्रम राबवणार आहे. गावची ग्रामसभा नुकतीच पार पडली या ग्रामसभेत तंटामुक्ती समिती १५ जणांची स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये वकील, पत्रकार, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका आधी सर्व घटकातील तज्ञ व्यक्तींचा सहभाग करण्यात आला आहे.

कलंबिस्त गाव तंटामुक्त वर्षभरात केला जाईल या दृष्टीने युवक व जेष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली आपण चांगले काम करणार असल्याचे श्री सावंत यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या निवडीबद्दल सरपंच सपना सावंत उपसरपंच सुरेश पास्ते आधी ग्रामपंचायत सदस्य शिवसेनेचे उपतालुका संघटक, माजी पंचायत समिती सदस्य रमेश सावंत, बाबी पास्ते, भाई देसाई, बाबा पास्ते, आजी माजी सैनिक संघटनेचे प्रकाश सावंत आधी ने अभिनंदन केले आहे.