Home स्टोरी 2000 रुपयांच्या नोटांची छापाई बंद?

2000 रुपयांच्या नोटांची छापाई बंद?

115

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या सर्वात मोठ्या चलनी नोटेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 2000 रुपयांची नोट मागे घेतली जाणार आहे. नोटांची यापुढे छापाई बंद केली जाणार आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, 23 मे 2023 पासून कोणत्याही बँकेत 2000 रुपयांच्या नोटा बदलल्या जाऊ शकतात. नोट बदलण्याची मर्यादा 20,000 रुपये असेल असे रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केलंय. मोदी सरकारने 2016 मध्ये नोटाबंदी केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट जारी केली होती. गेल्या काही महिन्यांपासून बाजारात 2000 रुपयांच्या नोटा कमी दिसत होत्या. एटीएममध्येही 2000 रुपयांच्या नोटा मिळत नसल्याचे लोकांनी सांगितले. या संदर्भात सरकारने संसदेतही माहिती दिली होती.

रिझर्व्ह बँकेने आपल्या वार्षिक अहवालात 2000 रुपयांच्या नोटेबाबत बरीच माहिती दिली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2019-20, आर्थिक वर्ष 2020-21 आणि आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापली गेली नाही. त्यामुळे बाजारात 2000 रुपयांच्या नोटांचे चलन कमी झाले आहे.8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेनंतर 500 आणि 1000 रुपयांच्या सर्व नोटा चलनातून बाद झाल्या. या चलनांऐवजी 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा रिझर्व्ह बँकेने जारी केल्या.

2017-18 या वर्षात देशात 2000 च्या नोटा सर्वाधिक प्रचलित होत्या. यादरम्यान बाजारात 2000 च्या 33,630 लाख नोटा चलनात होत्या. त्यांची एकूण किंमत 6.72 लाख कोटी रुपये होती. गेल्या दोन वर्षांपासून 2000 रुपयांची एकही नोट छापण्यात आलेली नाही अशी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी 2021 रोजी लोकसभेत माहिती दिली होती.