Home स्टोरी मिलाग्रिस हायस्कूल येथे मॉन्सून क्रीडा दिन उत्साहात साजरा

मिलाग्रिस हायस्कूल येथे मॉन्सून क्रीडा दिन उत्साहात साजरा

285

सावंतवाडी प्रतिनिधी: मिलाग्रिस हायस्कूलच्या भव्य पटांगणावर दिनांक १९ जुलै २०२४ रोजी मान्सून क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. Nया समारंभासाठी माननीय श्री गायकवाड सर (क्रीडा अधिकारी, सिंधुदुर्ग) विशेष पाहुणे म्हणून लाभले होते मान्यवरांच्या हस्ते या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले .शाळेच्या सर्व हाऊसच्या च्या विविध स्पर्धकांनी वेगवेगळ्या स्पर्धेत सहभाग घेतला.

यामध्ये १४ वर्षाखालील व १७ वर्षाखालील अशा दोन वयोगटांमध्ये मुला आणि मुलींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये व्हॉलीबॉल’ बास्केटबॉल, कबड्डी, लंगडी, डॉजबॉल, फुटबॉल यासारख्या खेळांचा प्रामुख्याने समावेश होता. सर्व मुलांनी या पावसाळी खेळांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. या महोत्सवाचे आयोजन प्रशालेचे प्राचार्य माननीय फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून केले गेले होते.