सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडी संचलित रोटरी ट्रस्ट सावंतवाडी यांच्यातर्फे सावंतवाडी शहरांमध्ये फिजिओथेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे, या सेंटरमध्ये अद्यावत उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत. तसेच या सेंटरमध्ये अँजेलो रॉड्रिक्स बॅचलर ऑफ फिजिओथेरपी या पदवीधर व अनुभवी फिजिओथेरपिस्ट सेवेसाठी उपलब्ध आहेत, या सेंटरमध्ये पॅरालिसीस बॅक पेन, नेक पेन, फ्रोजन सोल्जर, स्पोर्ट अंजुरी, पेडिया ट्रिक्स कंडिशन्स, सर वायकल स्पॉंडिलिसीस, र्पोस्ट ऑपरेटिवरी हॅबिलि स्टेशन उपलब्ध आहे. सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी असे हे पहिलेच सेंटर केंद्र सुरू करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत रोटरी क्लबचे अध्यक्ष सुहास सातोस्कर व सचिव प्रवीण परब यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दुर्गम ग्रामीण भागात आता बायोगॅस प्रकल्प गावागावात राबवण्याच्या दृष्टीने आमचा संकल्प आहे. सावंतवाडी चौकूळ, बेरडकी, येथे वीस बायोगॅस व त्या गावात जाण्यासाठी रस्त्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्गम व ग्रामीण भागात जवळपास २०० हून अधिक बायोगॅस उभारून देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. रोटरी क्लब तर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी श्री सातोस्कर म्हणाले गेल्या वर्षभरात रोटरी क्लब तर्फे आम्ही विविध उपक्रम राबविले मुलांमध्ये वाचन संस्कृती वाढण्याच्या दृष्टीने शाळांमध्ये जाऊन वाचक तयार केलेत. तसेच बेरडकी येथील मुले पाच किलोमीटर शाळेत ये जा करायची त्यांना सायकलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. आरोग्य शिक्षण या दृष्टीने आम्ही विविध उपक्रम राबविले. ग्रामपंचायत सक्षमीकरणासाठी सरपंच, उपसरपंच व सदस्यांना मार्गदर्शन शिबिरही आयोजित केले आहे. आता सावंतवाडी शहरात सेंटर सुरू करण्यात आले आहे. अद्यावत असे हे सेंटर असून या ठिकाणी सर्व सुविधा आहेत.
तसेच रोटरी क्लबचा या इमारतीत यापुढे बहुउद्देश हॉल सर्वांसाठी खुला ठेवण्यात येणार आहे. असे त्यांनी स्पष्ट केले. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त, शिरशिंगे भागात बायोगॅस प्रकल्प राबविण्यात येणार आहे. भगीरथ प्रतिष्ठान आणि रोटरी क्लब आणि शासन यांच्या माध्यमातून ही योजना राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
तसेच स्पीच थे रोपिस्ट, ऑडिओ मॅट्रिक टेस्ट सुविधेसाठी ह्या स्पीच थेरॉफीस्ट स्वाती ओरोसकर मंगळवार व शुक्रवार सायंकाळी पाच ते आठ या वेळेत फिजिओथेरपी सेंटरमध्ये उपलब्ध राहणार आहेत. तसेच ट्रेडमिल व सर्जिकल इक्विपमेंट उपलब्ध करून देण्यात येत आहेत. फिजिओथेरपी ची वेळ सोमवार ते शनिवार सायंकाळी पाच ते आठ अशी राहील. इमारतीमधील पहिल्या मजल्यावर सार्वजनिक उपक्रमासाठी एसी हॉल माफक दरात उपलब्ध करण्यात येत आहे.
तरी या सर्व सुविधांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा अशी विनंती रोटरी क्लब व रोटरी ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात येत आहे यावेळी श्रीमती विनया बाड, श्री आबा कशाळीकर, खजिनदार रोटरी क्लब सावंतवाडी प्रमोद भागवत, सुबोध शेलटकर, आनंद रसम, राजू पनवेलकर, दिलीप म्हापसेकर व इतर मंडळी उपस्थित होती.