ओटवणे प्रतिनिधी: कै. रघुनाथ टोपले यांनी आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी शॉर्टकटचा अवलंब न करता कठोर परिश्रम केल्यास यश हमखास मिळते हे दाखवून दिले. त्यांच्या सर्वसमावेशक सक्षम नेतृत्वामुळेच म्हापशात माध्यमिक शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक कार्य पुढे सुरू ठेवणे हीच त्यांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरणार आहे. असे प्रतिपादन ओटवणे शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा गोवा म्हापसा येथील जनता हायस्कूलचे सेवानिवृत्त शिक्षक वामन कविटकर यांनी केले
गोवा म्हापसा येथील जनता एज्युकेशन ट्रस्ट तथा ट्रस्ट संचलित जनता हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष कै. रघुनाथ अनंत टोपले यांच्या २४ व्या स्मृतिदिन कार्यक्रमात वामन कविटकर बोलत होते. यावेळी जनता एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र टोपले, ट्रस्टचे विश्वस्त तुषार टोपले, जनता हायस्कूलचे व्यवस्थापक डॉ हरीश टोपले, प्राथमिक शाळेचे व्यवस्थापक प्रशांत फेरारी, जनता हायस्कूलचे मुख्याध्यापक दत्ता शिरोडकर, माजी मुख्याध्यापक नरेंद्र कामत आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जितेंद्र टोपले, डॉ हरीश टोपले नरेंद्र कामत यानी रघुनाथ टोपले यांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच उपस्थित मान्यवरांनीही रघुनाथ टोपले यांचे शैक्षणिक कार्य चिरंतन राहील अशा शब्दात त्यांना आदरांजली वाहिली.
म्हापसा: कै रघुनाथ टोपले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना वामन कविटकर बाजूला जितेंद्र टोपले डॉ हरीश टोपले प्रशांत फेरारी तुषार टोपले दत्ता शिरोडकर नरेंद्र कामत