Home स्टोरी कलंबिस्त गावात “कार सेवकांच्या” कुटुंबीयांचा सन्मान…!

कलंबिस्त गावात “कार सेवकांच्या” कुटुंबीयांचा सन्मान…!

523

सावंतवाडी प्रतिनिधी: अयोध्येमध्ये श्री प्रभू रामाचे मंदिर उभारणीसाठी सन १९९२ सली सावंतवाडी तालुक्यातून सह्याद्री पट्ट्यातील कलंबिस्त गावातून दोन कार सेवक सहभागी झाले होते. दाजी लाडू सावंत व निळकंठ राऊळ या दोन्ही कार सेवकांच्या या केलेल्या सेवेबद्दल त्यांच्या कुटुंबीयांचा कलंबिस्त पंचक्रोशी दुग्धव्यवसायिक सहकारी मर्यादित कलंबिस्त व गावकऱ्यांच्या वतीने कलंबिस्त श्री देव रवळनाथ मंदिर सभागृह व्यासपीठावर प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हा सन्मान त्याचे कुटुंबीय प्रकाश दाजी सावंत, माजी पंचायत समिती सदस्य रमेश दाजी सावंत, लक्ष्मण निळकंठ राऊळ आणि गजानन लक्ष्मण राऊळ या चौघांना देण्यात आला. या गौरवाला उत्तर देताना गजानन राऊळ व रमेश सावंत म्हणाले की, श्री प्रभू रामा मंदिर उभारणीस गावातून आमचे वडील तीस वर्षांपूर्वी अयोध्येत गेले. आज ते मंदिर उभारणीचा सोहळा पाहण्यास नसले तरी त्यांचे स्मरण या दुग्ध संस्थेने केले. खरंच अशी सामाजिक भावना संस्थेने दाखवून आमच्या वडिलांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला आहे. आम्ही कुटुंबीय खरंच भाग्यवान आहोत. अशा सामाजिक प्रेरणेतून काम करणाऱ्या संस्थाचालकांच्या पाठीशी शेतकऱ्यांनी खंबीरपणे उभे राहायला हवे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी कलंबिस्त गावचे देवस्थानचे प्रमुख मानकरी गावकर अनिल हरी सावंत व देवकार अनिल सावंत तंटामुक्ती समिती अध्यक्ष अनिल सावंत, उपसरपंच सुरेश पास्ते, कॅप्टन अरुण सावंत यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत, सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत, माजी सैनिक प्रकाश सावंत, शिवसेना शाखाप्रमुख दिनेश सावंत, संचालक दत्ताराम कदम, प्रकाश तावडे, ग्रामपंचायत सदस्य दीपक जाधव, दूध शेतकरी राजन घाडी, पशुवैद्यकीय चिकित्सक स्वप्निल सावंत, प्रकाश पवार, लहू राऊळ, शिवाजी राऊळ, सौ. पास्ते, जानू पास्ते, माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाबा पास्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ज्ञान मंदिर वाचनालयाच्या संचालिका मिलन जंगम, कॅप्टन सुभाष सावंत, उदय सावंत, गणू सावंत, चंदू राजगे, पांडुरंग सावंत, अशोक सावंत, वसंत सावंत, श्री रमाकांत नाईक, अरुण सावंत आधी उपस्थित होते.

यावेळी यावेळी प्रास्ताविकात संस्थेचे चेअरमन एडवोकेट संतोष सावंत म्हणाले कलंबिस्त दुग्ध संस्था गेली सात वर्षाहून अधिक काळ या गावात सामाजिक भावनेतून कार्य करत आहे. दूध शेतकऱ्यांच्या विकासाच्या दृष्टीने तसेच गावातील अध्यात्मिक सामाजिक शैक्षणिक कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी यांना प्रोत्साहन देण्याचे कार्य करत आले आहे. या माध्यमातून गावात एक सामाजिक एकोपा निर्माण करण्याचे प्रयत्न आहेत. अयोध्या राम मंदिरासाठी कलंबिस्त गावातून दोघांनी अयोध्या राम मंदिर उभारणीसाठी कार सेवक म्हणून सहभागी झाले. त्यांनी राम मंदिर उभारणी करून खऱ्या अर्थाने गावाचे नाव उज्वल केले आहे. अशा या सन्माननीय व्यक्तींना आपण त्यांची आठवण कायम स्मरणात ठेवूया. अशा शब्दात त्यांचा गौरव केला.यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

(फोटो: सावंतवाडी कलंबिस्त दुग्ध संस्थेमार्फत कार सेवक यांच्या कुटुंबीयांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करताना गावातील प्रमुख मानकरी अनिल हरी सावंत, अनिल सावंत, एडवोकेट संतोष सावंत, रमेश सावंत, लक्ष्मण राऊळ, गजानन राऊळ, प्रकाश सावंत, पांडुरंग सावंत, संदीप सावंत, अरुण सावंत, ग्रामस्थ व संस्थेचे पदाधिकारी. छाया: स्वप्नील सावंत)