Home स्टोरी पोलीस रेजींग डे, बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती औचीत्याने उत्साहात साजरा…!

पोलीस रेजींग डे, बालिका दिन सावित्रीबाई फुले जयंती औचीत्याने उत्साहात साजरा…!

177

सावंतवाडी पोलीस ठाणे यांचा उपक्रम.

सावंतवाडी: आज दिनांक ३ जानेवारी २०२४ रोजी, सावित्री बाई फुले जन्मदिन, बालिका दिन निम्मित ११:०० ते १२:४५ या वेळेत, नेताजी सुभाषचंद्र बोस शिशुविहार, सबनीस वाडा सावंतवाडी येथे बालवाडी शिशु गटातील २ – ६ वयोगटातील मुले मुली यांनी आदरणीय ज्योतिबा फुले आणि सावत्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती

 

या कार्यक्रमात महाराष्ट्र पोलीस दल रेजिंग डे निम्मित सावंतवाडी पोलीस ठाणे मधील पोलीस अधिकारी आणि महीला अंमलदार यांनी उपस्थिती दाखवली. कार्यक्रमात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शिशु विहार चे अध्यक्षा आणि संस्थापक श्रीम. डॉक्टर सोनल लेले यांनी स्वागत केले. मुला मुलींनी यावेळी गणेश स्तोत्र, मारुती स्तोत्र, जय शारदे माता गीत, बडबडगीते, देश भक्तीपर गीत हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या, अशी गीते सादर केली. अतिशय सुंदर वेशभूषा आणि सुंदर आवाजात गायलेली गीते यामुळे एक अनोखा उत्साहवर्धक कार्यक्रम पूर्ण झाला.

पोलीस उपनिरिक्षक श्री अमित गोते, आनंद यशवंते, महीला पोलीस हवालदार मागदेलिन अमलेडा, स्वरा वरक, महीला पोलीस कॉन्स्टेबल गौरी ताम्हनेकर, या सावंतवाडी पोलीस ठाणे तर्फे हजर राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला, लहान मुलांना देश भावना वाढीस लागेल, त्यांची सुरक्षितता बाबत डायल ११२ प्रणालीची साधी ओळख बाबत माहिती दिली. लहान मुलांकडून प्रतिसाद खूपच उत्तम होता. शिशु विहारातील शिक्षिका उर्मिला राणे, प्रांजळ तिलवे, मदतनीस प्रतिभा गवळी यांच्या सहकार्याने अगदी अल्पावधीत उत्कृषटरित्या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले.

पोलीस आणि विद्यार्थी यांच्यात झालेला हा कार्यक्रम अगदी अविस्मरणीय ठरला. शेवटी डॉक्टर लेले मॅडम यांचे आभार प्रदर्शन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.