Home स्टोरी सावंतवाडी शहरातील मोती तलावात मंगळवारी रात्री पडलेल्या युवतीचा मृतदेह आज सापडला….

सावंतवाडी शहरातील मोती तलावात मंगळवारी रात्री पडलेल्या युवतीचा मृतदेह आज सापडला….

295

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी शहरातील मोती तलावात मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास एक युवती पडली होती. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरु होते. अखेर आज बुधवारी सकाळी तिचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. त्यानंतर नगरपालिकेच्या कर्मचार्‍यांनी बोटीच्या सहाय्याने तिथ पर्यंत जात मृतदेह बाहेर काढला. यावेळी पोलीस अधिकारी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते.

मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास ही युवती तलावात बुडाली होती. राजवाडा गेट समोर कठड्यावर बसलेली असताना ती पाण्यात पडली होती. यावेळी बाजूलाच असलेल्या दानिश राजगुरू नामक युवकाने तलावात उडी घेत तिला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याला यश आले नव्हते.

दरम्यान, सदरची युवती स्वतःहून पाण्यात पडली की तिने उडी घेतली याबाबत कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झाली नाहीय. पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेहाची ओळख पटलेली नाही. ओळख पटल्यानंतरच नेमके कारण सष्ट होणार आहे.