Home स्टोरी महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश!

महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश!

84

देवगड: तालुक्यातील महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार या प्रशालेच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन केलं आहे. 11 व 12 ऑक्टोबर रोजी शेठ म. ग. हायस्कूल, देवगडच्या मैदानावर सदर स्पर्धा संपन्न झाल्या. यात 17 वर्षाखालील वयोगटात मुलगे व मुली कु. आयुष संजय पारकर ( लांब उडी – द्वितीय ), कु. भूमी आनंद कुळये ( लांब उडी – द्वितीय ), कु. आनंद श्रीकांत नलावडे ( लांब उडी – तृतीय ) तसेच 4 × 100 मीटर रिले स्पर्धेत मुलांच्या संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

 

प्रशालेच्या वतीने 14 वर्षाखालील गटात कु. मसिरा कासम पनलेकर 600 मीटर मॅरेथॉन मध्ये प्रथम, कु. अनुष्का नरेंद्र कदम 400 मीटर स्पर्धेत द्वितीय, कु. प्रणव प्रसाद ठाकूर 400 मीटर – तृतीय, कु. पार्थ सचिन लब्दे – 200 मीटर – तृतीय, तसेच 4×100 मीटर रिले स्पर्धेत मुलांनी तृतीय व मुलींनी द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष श्री. संदीपशेठ तेली, उपाध्यक्ष राजेंद्रशेठ म्हापसेकर, खजिनदार संतोष वरेरकर, सचिव कृष्णा साटम, सर्व संस्था पदाधिकारी संचालक, मुख्याध्यापक आर. ए. घोगळे, शालेय समिती अध्यक्ष, सर्व सदस्य, माता पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्य, प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्गाने अभिनंदन केले आहे.