२ जुलै वार्ता: सोलापूरहून दिल्लीच्या दिशेने जाणार्या गाडी क्रमांक 12627 केके एक्सप्रेस या गाडीच्या इंजिनमध्ये सोलापूर जवळील मलिक पेठ येथे सकाळी ९:४५ च्या सुमारास शॉर्टसर्किट झाल्याने भीषण आग लागली. यामध्ये रेल्वे चालक जखमी झाले आहेत. आग लागल्याचे रेल्वे चालकाच्या लक्षात येताच चालकाने सतर्कता दाखवत तात्काळ गाडी थांबवली. त्यामुळे प्रवासी सुखरूप आहेत.