Home स्टोरी देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया प्रशिक्षणाचे आयोजन

75

सावंतवाडी प्रतिनिधी: आपल्या देशाची लोकशाही या लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत प्रभावी प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया शालेय महाविद्यालयीन जीवनापासूनच निवडणूक प्रक्रिये बाबतची कल्पना असावी आणि यातून नेतृत्व गुण आणि प्रशासकीय कामकाज पद्धती कशी हाताळली जाते याचा परिपूर्ण अभ्यास असणे फार महत्त्वाचे आहे. फक्त कॉलेजमधील पुस्तकी ज्ञान मिळवणे म्हणजे तो विद्यार्थी प्रगत झाला असे नाही तर त्याला सर्व समाज व्यवस्थेतील आणि प्रशासकीय व्यवस्थेतील जाणं असणे गरजेचे आहे.  येत्या 2024 मध्ये लोकसभा निवडणुका प्रक्रिया होणार आहेत त्या धर्तीवर केंद्रीय निवडणूक व राज्य निवडणूक आयोगाने मतदार आणि मतदान प्रक्रिये बाबतची माहिती प्रत्येक शाळा कॉलेज महाविद्यालय आणि घरोघरी जाऊन दिली जात आहे. असे असतानाच लोकमान्य ट्रस्ट, देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय याने आपल्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी यासाठी सोमवारी शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला कॉलेजमध्ये संपूर्ण निवडणूक प्रक्रिया राबवली. त्यासाठी मतदान केंद्र, मतदान बॅलेट पेपर आणि प्रचार यंत्रणा अशी सर्व प्रक्रिया राबवत विद्यार्थी प्रतिनिधी साठी मतदान दिवस साजरा केला. देश राज्य आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी घटत चालली आहे आणि तरुणाई मतदान प्रक्रियेपासून आणि निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहत आहे. त्यांना पुढील काळात मतदानाचा हक्क प्रक्रिया समजावी या उद्देशाने आजचा मतदार दिवस निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.यातून मतदान प्रक्रियेचे प्रबोधन ही करण्यात आले.

2024 ची लोकसभा निवडणूक या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी स्वतःहून मतदानासाठी पुढे यावे आणि आपले अमूल्य मत प्रदान करावे यासाठी प्रात्यक्षिक म्हणून गव्हाणकर महाविद्यालयांमध्ये आज विद्यार्थ्यांनी प्रतिनिधी निवडणूक संपन्न झाली या मतदानामध्ये विद्यार्थी प्रतिनिधी व एक विद्यार्थिनी प्रतिनिधी अशी निवड होणार आहे मतदान योग्य पद्धतीने पार पाडले यामध्ये विद्यार्थ्यांना मतदान पद्धती कशी असते त्याची  कशा पद्धतीने आपण मतदान पूर्ण करतो याची पूर्ण प्रॅक्टिकली माहिती विद्यार्थ्यांना आज विद्यार्थ्यांना आज पाहता आली.. या कॉलेजने अशी निवडणूक प्रक्रिया राबवून एक प्रकारे आगळावेगळा उपक्रमही राबवला

 

यावेळी या मतदान प्रक्रिया कार्यक्रमाची उद्घाटन तरुण भारतचे प्रतिनिधी कोकण मराठी साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष ॲडसंतोष सावंत यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया अत्यंत महत्त्वाचे प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीला समजायला हवी मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे. तो बजवायलाच हवा आपण दिलेले अनमोल मत यातून आपण आपला हक्काचा प्रतिनिधी निवडत असतो. यामुळे विद्यार्थ्यांना मतदान किती महत्त्वाचे आहे व  मतदानामुळे आपण भारतासारख्या लोकशाही देशांमध्ये मतदान किती महत्त्वाचे आहे हे सुद्धा महत्त्व पटवून दिले. आपली गुणवत्ता त्याचबरोबर आपल्या मध्ये असलेला लीडरशिप पणा समोर येतो व आपण आपल्या समाजासाठी सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणात करता येते. प्रास्ताविक प्राचार्य यशोधन गवस यांनी केले आभार प्राध्यापक साईप्रसाद पंडित यांनी मांडले केले या हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक आनंद नाईक, अस्मिता गवस, शैलेश गावडे, मेधा मयेकर इतर कर्मचारी अमर धोंड संतोष सावंत प्रवीण तुयेकर, महेश जाधव यांनी पाहिले.

फोटो: सावंतवाडी लोकमान्य ट्रस्टच्या देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयात निवडणूक प्रक्रिया मतदानाचा हक्क कसा बजवावा याबाबतची जनजागृती अभियान राबवताना व त्याचे उद्घाटन करताना तरुण भारतचे प्रतिनिधीॲड संतोष सावंत, बाजूला प्राचार्य यशोधन गवस, साई प्रसाद, पंडित, अस्मिता गवस, अमर धोंड आधी.