Home स्टोरी रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

71

सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडीच्या वतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये जवळपास ३६ जणांनी रक्तदान केले. कै. बाळ बांदेकर यांच्या स्मृतिपित्यार्थ रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन रोटरी क्लबचे सचिव प्रवीण परब यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी खजिनदार आबा कशाळीकर, अनंत उचगावकर, सत्यजित धारणकर, विनया बाड, डॉक्टर संदीप सावंत, श्री बांदेकर, नागेश कदम, अक्षय भावेश आधी उपस्थित होते. सावंतवाडी रोटरी क्लब तर्फे घेण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक चे विद्यार्थी, एसपीके कॉलेज विद्यार्थी आणि युथ क्लब मेंबर्स आधी तरुणांनी रक्तदान केले