सावंतवाडी प्रतिनिधी: रोटरी क्लब सावंतवाडी यांच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. वाचन संस्कृती वाढावी यासाठी रोटरी क्लब ने डेगवे माध्यमिक विद्यालयात वाचन संस्कृती जपावी असा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राबवला. यावेळी रोटरी क्लबच्या माजी अध्यक्ष विनया बाळ, सचिव प्रवीण परब, श्री फातर्पेकर, सौ फातर्पेकर, शाळेचे मुख्याध्यापक आधी उपस्थित होते.
यावेळी श्री फातर्फेकर म्हणाले तंत्रज्ञानाच्या विकसित सोशल साईटच्या अनोख्या आभासी जगात वाहवत जात असलेल्या शाळकरी आणि तरुण मुलांना वाचनाकडे पुन्हा वळवण्यासाठी मुलांमध्ये वाचन संस्कृतीची गोडी निर्माण व्हावी यासाठी सावंतवाडी रोटरी क्लब ने हा उपक्रम राबवला आहे हे स्तुत्य आहे. शाळेतील मुलांनी वाचनाची गोडी वाढवावी असे ते म्हणाले. यावेळी सचिव प्रवीण परब यांनी प्रास्ताविक केले. शाळांमध्ये अशी वाचन संस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने रोटरी क्लब उपक्रम राबवणार आहे. त्याचीही सुरुवात असल्याचे ते म्हणाले.