सावंतवाडी प्रतिनिधी: ८ ते १४ वयोगटातील मुलांसाठी “पर्सनल डेव्हलपमेंट” कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. तात्या मुलांच्या आरोग्य तसेच मुलांचे भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या मोबाईलच्या आणि इंटरनेटच्या युगात मुलं दिवसेंदिवस मोबाईल कडे वळत आहे. तसेच सोशल मीडिया प्लेटफॉर्म वापरत आहेत. काही मुलांना तर मोबाईलचे व्यसन लागलेले आहे हे नाकारता येणार नाही. मोबाईलद्वारे सोशल मीडियावर अनेक चुकीचे व्हिडिओ, चुकीच्या रिल्स कळत नकळत मुलं बघत आहेत आणि यामुळे मुलांच्या मनावर विपरीत परिणाम होत आहे असे दिसून येत आहे. या सर्व चुकीच्या सवयींचा एकंदरीत मुलांच्या अभ्यासावर आणि मुलांच्या भविष्यावर परिणाम होत आहे. एवढेच नाही तर आता सिद्ध होत आहे की मोबाईलचे व्यसन हे मुलांच्या थेट मेंदूवर परिणाम करत आहे. यामुळे मुलं सहाजिकच आळशी, विकृत प्रवृत्तीची आणि चुकीच्या वळणावर जाताना दिसत आहेत. यामुळे साहजिकच मुलांचा अभ्यासाकडे आणि स्वतःच्या प्रगतीकडे दुर्लक्ष होत आहे आणि यापुढे पालक आता हतबल होतांना दिसत आहेत. या सर्व गोष्टींचा एकंदरीत विचार करता आपली पुढील पिढी धोक्यात आहे असे दिसून येत आहे.

आज इंस्टाग्राम, facebook, whatsapp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आजच्या काही तरुण-तरुणी स्वतःच्या प्रसिद्धीसाठी घाणेरडे व्हिडिओ प्रसारित करत आहेत. थोडक्यात सांगायचं तर काही तरुण-तरुणी आज सोशल मीडियाच्या गैरवापर करत स्वतःचे अब्रू चव्हाट्यावर आणत आहेत हे नाकारता येणार नाही. आपली मुलं जर अशा पद्धतीने वागायला लागली तर हे खूप घातक होणार आहे आणि आपल्या मुलांचे भविष्य उध्वस्त होणार आहे. हे समजून घेणे हि काळाची गरज आहे. अशा परिस्थितीत आज मुलांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. यामुळे मुलांना पर्सनल डेव्हलपमेंट हा कॅम्प आयोजित करत आहोत.

आज लहान मुलं मोबाईल मध्ये व्हिडिओ गेम खेळण्याकडे जास्त लक्ष देत आहेत. ज्यामुळे डोळ्यांवर आणि मेंदूवर त्याचे दुष्परिणाम होत आहेत आणि मुलांचा अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे. “पर्सनल डेव्हलपमेंट” कॅम्पमध्ये मुलांना या दुष्परिणामांची जाणीव करून देत मैदानी खेळांचे महत्व समजावून सांगुन काही महत्त्वाचे मैदानी खेळहि शिकवण्यात येतील. तसेच मुलांना थोडक्यात योग प्रशिक्षण देण्यात येईल आणि मुलांना प्राणायाम, ध्यान याबाबत माहिती देण्यात येईल. योगा, ध्यान आणि प्राणायाम याचे शरिरावार चांगले परिणाम होतात आणि आरोग्य चांगले राहते याची जाणीव करून दिली जाईल.
पर्सनल डेव्हलपमेंट या कॅम्पमध्ये मुलांना पुढील गोष्टी शिकवण्यात येणार आहेत.
१) रात्री लवकर झोपणे आणि सकाळी लवकर उठणे यामुळे होणारे फायदे
२) स्वछतेचे महत्व
३) काही महत्वाचे व्यायाम आणि नियमित व्यायामाचे महत्व
४) देव पूजेचे, प्रार्थनेचे महत्व
५) योग्य आहाराचे (जेवण) महत्व आणि चायनीज, वडापाव, बेकरीतील पदार्थां चे शरीरावर होणारे दुष्परिणाम.
६) मोबाईल, इंटरनेट आणि सोशल मीडियाचे दुष्परिणाम
👆 हे सर्व काही कॅम्पमध्ये शिकवले जाईल आणि समजावून देण्यात येईल. तसेच आणि इतर बरेच काही महत्त्वपूर्ण शिक्षण कॅम्पमध्ये देण्यात येईल. तसेच आई-वडिलांचा आदर करणे, आपली संस्कृती, आपला धर्म याबाबत माहिती देण्यात येईल. उत्कृष्ट जीवनशैली आणि निरोगी आयुष्य याचे महत्त्व मुलांना शिकवण्यात येईल. या महत्वपूर्ण अशा कॅम्पमध्ये आपण आपल्या मुलाचा प्रवेश निश्चित करा आणि आपल्या मुलांना जीवनात योग्य ती दिशा देण्यासाठी एक पाऊल पुढे टाका हि नम्र विनंती.
या कॅम्पमध्ये मुलांसाठी राहण्याची, जेवणाची आणि नाश्त्याची सोय आहे. जेवण शाकाहारी असणार आहे. हा कॅम्प एकूण ११ दिवसांचा असणार आहे. या कॅम्पचे शुल्क १२०००-/ (बारा हजार रुपये ) आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा किंवा व्हाट्सअप करा. 9209391117
महत्वाची सूचना..! हा कॅम्प फक्त हिंदू धर्मातील मुलांसाठी आहे. कृपया इतर कोणी फोन करू नये. हि नम्र विनंती. 🙏







