४ सप्टेंबर वार्ता: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षाचे नेते राज्यभरात दौरे करत आहेत. यातच आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढताना दिसत आहेत. यादरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका सभेला संबोधित केले. भाजपमधील अंतर्गत वादावर भाष्य करताना नाना पटोले म्हणाले की, पूर्वी गडकरी काय बोलायचे आणि आता काय बोलत आहेत, हे बारकाईने पाहा. पूर्वी गडकरी म्हणायचे तलावात विमान उतरवेल, हवेत बस उडवेन, गडकरी यांच्या अशाच घोषणा होत्या. पण आता संधी दिसताच गडकरी सरसावले आहेत. ५० खासदार कमी पडले तर नितीन गडकरींना पंतप्रधानपदाची संधी मिळू शकते, असे चर्चा दबक्या आवाजात सुरू झाली आहे. त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्या वाद सुरू झाला, असा मोठा दावा नाना पटोले यांनी केला. तसेच डिसेंबरमध्ये सर्व्हे होईल तेव्हा भाजपचा आकडा पुन्हा खाली येईल, असेही नाना पटोले म्हणाले.
आता मशिनबिशिन काही कामी येणार नाही. आपल्या मतविभाजनामुळे आपण हरलो होतो. लोकशाहीची थट्टा चालवली आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. जालन्यात जो लाठीचार्ज झाला तो अमानुष होता. पेटलेला वणवा सरकारने थांबवला पाहिजे नाही तर जनता वणवा पेटवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने माफी मागितली पाहिजे. राज्यात दुष्काळचे परिस्थिती आहे आणि सरकार शासन आपल्या दारी माध्यमातून जनतेच्या पैशाची उधळपट्टी करत आहे. स्वत;च्या हाताने आपली पाठ थोपटत आहे, या शब्दांत सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला.