Home क्राईम ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर!

३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर!

95

२५ मे वार्ता: बोर्डाने आज बारावीचे निकाल जाहीर केले असून यावेळी ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेतील हस्ताक्षराच्या प्रकरणावर स्पष्टीकरणही दिलं. साडे तीनशेहून अधिक विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेत एकसारखे हस्ताक्षर आढळल्यानंतर बोर्डाकडून याची चौकशी केली गेली. या चौकशीत धक्कादायक अशी माहिती समोर आली.

दरम्यान, मुलांनी हे हस्ताक्षर आमचे नसल्याचंही सांगितलं आहे. त्यामुळे हे विद्यार्थी दोषी नाहीत असं बोर्डाने म्हटलंय.त्यांना वेगळ्या हस्ताक्षरातील उत्तरांचे गुण मिळणार नाहीत असेही बोर्डाने स्पष्ट केले. हस्ताक्षर घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोयगाव तालुक्यातील फर्दापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल कऱण्याचीही प्रकिया सुरू आहे. याबाबत विभागीय सचिव विजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.