Home स्टोरी २ वर्षांपर्यंतच्या मुलांना सर्दी-खोकल्याचे औषध देऊ नका ! केंद्र सरकार.

२ वर्षांपर्यंतच्या मुलांना सर्दी-खोकल्याचे औषध देऊ नका ! केंद्र सरकार.

149

दिल्ली: मध्यप्रदेश आणि राजस्थान या राज्यांमध्ये खोकल्याचे औषध घेतल्यानंतर एकाच दिवसात ११ मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना सूचना दिली की, २ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलांना खोकला आणि सर्दी यांची औषधे देऊ नयेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत येणार्‍या ‘आरोग्य सेवा महासंचालनालया’ने ही सूचना दिली.

 

महासंचालयाने पुढे म्हटले की, ५ वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलांसाठी खोकल्याच्या औषधांची शिफारस केली जात नाही. ती दिलीच, तर डॉक्टरांच्या देखरेखीखाली, योग्य प्रमाणात, तसेच अत्यल्प कालावधीसाठी दिली पाहिजे.

 

कफ सिरप’मध्ये ‘डायथिलीन ग्लायकोल’ किंवा ‘इथिलीन ग्लायकोल’ असेल, तर ते दोन्ही मूत्रपिंडांना गंभीर हानी पोचवू शकतात, असे अभ्यासकांचे मत आहे. तथापि मध्यप्रदेशात मृत्यू झालेल्या बालकांना दिलेल्या सिरपमध्ये ही रसायने आढळली नाहीत.

महाराष्ट्रात २६ सहस्र ९३५ लिटर कफ सिरपचा साठा नष्ट ! महाराष्ट्रात पोलिसांनी २६ सहस्र ९३५ लिटर ‘कोडीन’ रसायन असलेले कफ सिरप नष्ट करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. तसेच तमिळनाडू सरकारने ‘कोल्ड्रिफ कफ सिरप’च्या विक्रीवर बंदी घातली. या सिरपच्या बाटल्या बाजारातून हटवण्याचा आदेश देण्यात आला.