Home स्पोर्ट २४ वी मुंबई डिस्ट्रिक तायकोंदो क्रीडा स्पर्धे मध्ये निशा सोलकर हीला...

२४ वी मुंबई डिस्ट्रिक तायकोंदो क्रीडा स्पर्धे मध्ये निशा सोलकर हीला गोल्ड मेडल!

293

निशा सोलकर मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या!

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): महर्षी दयानंद कॉलेज परेल ची इयत्ता १२ वी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि चिल्ड्रन्स तायकाँदो अकादमी परेल मध्ये प्रशिक्षण घेणारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील रामगड गावची कन्या निशा प्रमोद सोलकर हिने दिनांक ९ जुलै या कालावधीत सहकार नगर अप्पर प्रायमरी मुनिसिपल स्कूल वडाळा मुंबई येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदोमुंबई डिस्ट्रिक क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये मुलींच्या गटामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत निशा हिला सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.

सुवर्णपदक विजेता निशा सोलकर

ही स्पर्धा तायक्वांदो असोसिएशन ऑफ मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली होती. निशा सोलकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हा, राज्यस्तरीय तसेच आंतरराज्य स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेली आहेत. निशा सोलकर ही चिल्ड्रन्स तायक्वांदो अकादमी मुंबई परेल येथे प्रशिक्षण घेत असून तिला मुख्य प्रशिक्षक म्हणून सिद्धेश जाधव, संकेत भोसले, सुदेश पवार सर आणि एम डी कॉलेजचे मार्गदर्शन लाभत आहे. तसेच निशा हिला तिचे वडील प्रमोद सोलकर आणि आई पूजा सोलकर यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. निशा सोलकर हीने विविध नृत्य स्पर्धेमध्ये सुधा प्रथम क्रमांक प्राप्त केले असून महिलांच्या दशावतार मध्येही तिने मोलाची कामगिरी केली आहे. तिच्या या यशाबद्दल महर्षी दयानंद कॉलेज परेल च्या वतीने विशेष अभिनंदन केले आहे. याबरोबरच रामगड, मसुरे गावातही तिचे कौतुक होत आहे.