Home क्राईम २००८ मधील बेंगळुरूतील साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी महंमद अरशद खान याला अटक

२००८ मधील बेंगळुरूतील साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी महंमद अरशद खान याला अटक

133

३१ ऑगस्ट वार्ता: बेंगळुरू येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटाच्या प्रकरणी आणखी एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली. आतंकवादी गटाचा पसार म्होरक्या महंमद जुनैद याचा साथीदार महंमद अरशद खान याला कर्नाटक पोलिसांनी अटक केली आहे. महंमद अरशद याचा बेंगळुरूमध्ये आतंकवाद पसरवण्याचा उद्देश होता.महंमद अरशद खान याच्या अटकेमुळे पसार आतंकवादी महंमद जुनैदविषयी महत्त्वाची माहिती मिळू शकते, असे पोलीस अधिकार्‍यांचे म्हणणे आहे. खान याच्यावर हत्या, चोरी आणि इतर गंभीर गुन्ह्यांसह १७ गुन्हे नोंद आहेत. आतंकवादी कटाचा मुख्य सूत्रधार महंमद जुनैद स्थानिक गटाला शस्त्रे आणि दारूगोळा पुरवत होता. महंमद जुनैद याने आतंकवादी कारवायांचा कट रचला होता. तो अफगाणिस्तानच्या सीमावर्ती भागातून कार्यरत असल्याचा संशय आहे.

 

या प्रकरणाचे अन्वेषण करणार्‍या पोलिसांना या आतंकवादी गटाचे लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याचे आढळून आले आहे.