२७ जुलै वार्ता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक दिवसाचा पुणे दौरा निश्चित झाला आहे. १ ऑगस्ट या दिवशी हा दौरा होणार असून या दौर्यात ते आधी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेणार असून त्यानंतर ते लोकमान्य टिळक पुरस्काराच्या कार्यक्रमाला येणार आहेत. हा कार्यक्रम निमंत्रितांसाठीच असणार आहे. दुसरा कार्यक्रम पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, तसेच पी.एम्.आर्.डी.ए.च्या प्रकल्पाचे भूमीपूजन हा असणार आहे. तसेच या कार्यक्रमांच्या ठिकाणीच त्यांची जाहीर सभा होणार असल्याने या निमित्ताने पुण्यात भाजपच्या लोकसभा निवडणूक प्रचाराचा शुभारंभ असणार असल्याची चर्चा आहे.








