१६ सप्टेंबर वार्ता: १ ऑक्टोबर २०२३ पासून जन्म प्रमाणपत्राविषयी (‘बर्थ सर्टिफिकेट’विषयी) नवीन नियम लागू होणार आहे. या नवीन नियमानुसार, जन्म प्रमाणपत्राच्या आधारे शाळा प्रवेशापासून ते वाहनचालक परवाना, सरकारी नोकरी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, विवाह नोंदणी इत्यादी कागदपत्रे मिळवणे शक्य होणार आहे.केंद्र सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये ‘जन्म आणि मृत्यू नोंदणी (सुधारणा) विधेयक, २०२३’ सादर केले होते. यानंतर या विधेयकेला राष्ट्रपतींची अनुमती मिळाली. केंद्र सरकारने त्याअंतर्गत बनवलेले नियम १ ऑक्टोबरपासून लागू करण्याची घोषणाही केली आहे. नवा कायदा लागू झाल्यानंतर जन्म-मृत्यूचे दाखलेही डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत.