मालवणच्या टोपीवाला हायस्कूलच्या १९६८ दहावी बॅचचे ‘गेट टुगेदर’ संपन्न.!
मालवण: येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलच्या सन 1968 च्या बॅटचे गेट-टुगेदर आज संपन्न झाले. प्रारंभी माजी विद्यार्थी दिगंबर सामंत यांनी 1968 च्या बॅचचे सातत्याने तब्बल गेली दहा वर्षे शाळेत दरवर्षी एकत्र येतात, याबद्दल उपस्थित वर्गमित्रांना धन्यवाद देत त्यांचे स्वागत केले. अविनाश आजगावकर यांनी शाळेच्या विविध नवनवीन संकल्पनांचा आढावा घेतला. तसेच उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव विजय कामत यांनी स्वागत केले व सातत्याने आपण शाळेत येत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर यांनी शाळेच्या एकूण प्रगतीचा आढावा उपस्थित माजी विद्यार्थ्यांसमोर सादर केला व शाळेच्या होत असलेल्या प्रगतीत माजी विद्यार्थ्यांचा मौलिक सहभाग असल्याचे नमूद केले. या बॅचचे माजी विद्यार्थी व सेवानिवृत्त बँक कर्मचारी पॉली परेरा यांनी सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे व वेळोवेळी असे स्नेहमिलन घडवून आणणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचे आभार मानत पुढील वर्षी अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित करावा, अशी सूचना केली.
या संपूर्ण कार्यक्रमास माजी विद्यार्थी पॉली परेरा, श्री. व सौ. चंदू जामसंडेकर, विजयानंद अणावकर, रामदास कांदळगावकर, रमेश करंगुटकर, सहदेव गवंडी, प्रकाश तोरस्कर, जगदीश दलाल, श्रीमती सुमन देसाई, सिंधू जोशी, छाया हडक,र संध्या सामंत श्री. व सौ. निशा पाटणकर, श्री. व सौ. वैशाली सामंत व सुप्रसिद्ध कृषी तज्ज्ञ दादा सामंत आदी उपस्थित होते.