सावंतवाडी प्रतिनिधी: शब्दांना नसते सुख दुःख..! जे वाहतात ते तुमचे आमचे ओझे…! शब्द कवितेचा शब्द आहे. तर मनातल्या भावना हा कवितेचा पाया आहे. कविता भावनेवर लिहिली जाते. कवितेमध्ये अचूक शब्द आला पाहिजे. त्यासाठी भरपूर कविता त्यांचे आकलन आणि त्याचा अभ्यास करायलाच हवा. अंतर्मुख होऊन कविता वाचायला हव्यात. तेव्हाच तुम्ही दर्जेदार कवी बनू शकाल. आजची कविता सायबर सोशल बेसची झाली आहे. त्यामुळे तुमच्या कवितेला भरपूर लाईक येतात. तुम्हाला थर्म्स मिळतात. पण खऱ्या अर्थाने अशा सोशल माध्यमांद्वारे कविता व्यक्त होता येत नाही. कविता व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ महत्त्वाचे आहे आणि हे व्यासपीठ कविता सादर करूनच मिळते. सावंतवाडीमध्ये विभागीय कवयित्री संमेलन हे दर्जेदार कवी संमेलन भरवले जात आहे. असे व्यासपीठ मिळायला हवे. तरच कवितेची व लेखनाची चळवळ ही व्यापकतेने पुढे जाईल. असे मत कोकण मराठी साहित्य परिषद च्या केंद्रीय अध्यक्ष सौ नमिता कीर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील राणी पार्वती देवी हायस्कूल च्या सभागृहात चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेतर्फे आरती मासिक प्रमुख आयोजनाखाली कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा व श्रीराम वाचन मंदिर यांच्या संयुक्त सहकार्याने १८ वे निमंत्रित विभागीय कवयित्री संमेलन चे उद्घाटन सौ कीर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर संमेलनाच्या अध्यक्षा ज्येष्ठ साहित्यिका हेमांगी नेरकर, डॉ. माटे, प्रा पोर्णिमा केरकर, सौ रजनी रायकर, कविता आमोणकर, ज्येष्ठ लेखिका उषा परब आधी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना सौ कीर पुढे म्हणाल्या समर्पित भावनेने सावंतवाडीमध्ये विभागीय निमंत्रित कवी संमेलन सातत्याने केली १८ वर्ष भरवले जात आहे. हे सर्व कार्य जेष्ठ साहित्यिका उषा परब व त्यांच्या टीम मुळे शक्य होत आहे. ही जबाबदारी पेलणे फार मोठे काम आहे. आता ही जबाबदारी सर्व कवियत्रींची आहे. खरंतर आजची कविता सायबर बेस ची झाली आहे. फेसबुक सोशल मीडिया हे सादर करण्याचे माध्यम झाले आहे.अशा कवितांना लाईक खूप मिळतात पण खऱ्या अर्थाने तुम्ही ज्या कविता लिहिता त्या कविता माणसाच्या मनाला भावाला हव्यात. शब्द कवितेचा आत्मा आहे. तर भावना हा पाया आहे कविता भावनेने लिहिल्या जातात. शब्दांना सुखदुःख नसते. ते आपले सर्वांचे ओझे वाहतात त्यामुळे कविता लिहिताना अचूक शब्द आला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही फार कविता वाचायला हव्यात. कवितेत माणूस केंद्र असायला हवा. भावना जगणं हे कवितेत दिसतं.. कविता लिहायला हवी. असं प्रत्येकाला वाटतं फक्त कविता लिहिणे म्हणजे कवी होणे नव्हे. लिहिता येणं महत्त्वाचं नाही. तुम्ही खूप कविता वाचायला हव्यात, वाचलेल्या कवितांचं अनुकरण करता आलं पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला अनेक कविता गवसायला लागतील तेव्हा तुम्ही लिहिते व्हाल. तुमचं भावना आणि तुमचं मन हे कवितेचा आरसा आहे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी प्रास्ताविक संयोजिका ज्येष्ठ साहित्यिक लेखिका उषा परब यांनी केले. त्या म्हणाल्या सातत्याने केली. १८ वर्ष करोना काळ सोडला तर हे विभागीय कवयित्री संमेलन भरवले जात आहे. साहित्य आणि समाज या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. साहित्य चळवळ पुढे न्यावी त्या दृष्टीने हे कवियत्री संमेलन भरवले जात आहे. गोवा कोल्हापूर मुंबई आदी भागातून कवियत्री भाग घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात विभागीय कवयित्री संमेलन कधी होते. याची उत्सुकता दरवर्षी लागली जाते हे फार महत्त्वाचे आहे. असे त्या म्हणाल्या.
यावेळी उपस्थितांचे स्वागत व सत्कारउषा परब यांनी केले. तर निमंत्रित कवियत्रीं यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष प्रा. जी. ए. बुवा व कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष अँड. संतोष सावंत, प्रा. सुभाष गोवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोकण मराठी साहित्य परिषद चे जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के, सचिव विठ्ठल कदम, खजिनदार भरत गावडे, ॲड नकुल पारसेकर, ॲड प्रकाश परब, सुनील राऊळ, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ दीपक तुपकर, सचिव प्रतिभा चव्हाण, दीपक पटेकर, प्रज्ञा मातोंडकर, मंगल नाईक, मेघना राऊळ, ऋतुजा सावंत भोसले, रामदास पारकर, प्रवीण परब, संजय लाड, सुहासिनी सडेकर व इनरव्हील क्लबच्या सर्व सदस्य आधी उपस्थित होते.
यावेळी सूत्रसंचालन मेघना राऊळ व प्रज्ञा मातोंडकर तर परिचय वाचन श्वेतल परब व ऋतुजा सावंत भोसले. यांनी केले. यावेळी इनरव्हील क्लबच्या चांगल्या कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने कवियत्री उपस्थित होते.