सावंतवाडी प्रतिनिधी: मुंबई केळवा रोड येथील श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने शुक्रवारी १७ व १८ मे रोजी दाणोली येथील साटम महाराज समाधी मंदिरात श्री दत्तयागाचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त समाधी मंदिरात शुक्रवारी सकाळी ७:३० वाजता संकल्प, गणेश पूजन, त्यानंतर दहा हजार जप सुरू, दुपारी १ वाजता नैवेद्य त्यानंतर महाप्रसाद, सायंकाळी ७ वाजता महाआरती होणार आहे. शनिवारी १८ मे रोजी सकाळी ७ वाजता पुण्यवाहन, नांदी श्राद्ध, त्यानंतर नवग्रह पूजन, हवन व दत्तयाग सुरू, दुपारी १२:३० वाजता पूर्णाहुती, त्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसाद आदी कार्यक्रम होणार आहेत.
भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री समर्थ साटम महाराज सेवाश्रम यांच्यावतीने करण्यात आले आहे.