Home स्टोरी १५ ऑगस्ट पासून शासकीय रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क

१५ ऑगस्ट पासून शासकीय रुग्णालयात रुग्णांना सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क

94

१२ ऑगस्ट वार्ता: आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना देण्यात येणाऱ्या सर्व प्रकारच्या वैद्यकीय सेवा निःशुल्क उपलब्ध होणार आहेत. येत्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ ऑगस्टपासून याचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना निःशुल्क उपचार मिळावेत यासाठी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी सातत्यानं पाठपुरावा केला होता, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.