Home स्टोरी १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

१४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता

186

१४ मार्च (वार्ता.) – हवामान खात्याने १४ आणि १५ मार्च या दिवशी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी प्रतिघंटा ३० ते ४० कि.मी. वेगाने वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गडगडाट चालू असतांना मोकळ्या जागेत राहू नये, असे हवामान विभागाने म्हटले आहे.गेले २ आठवडे गोवा आणि सिंधुदुर्ग येथे कडक उष्मा जाणवत आहे. आता हवेत बाष्पही निर्माण झाले आहे. १३ मार्चला कमाल तापमान ३५ अंश सेल्सियसहून अधिक होते.