म्हसळा प्रतिनिधी:(संजय सांबेटे): मार्च २०२३ मध्ये झालेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज २५ जून २०२३ रोजी लागला.म्हसळयांतील आयडीयल ज्युनीअर कॉलेज १०० %,न्यू इंग्लिश स्कूल आणि जुनिअर कॉलेज म्हसळा चा एकूण ९५.१४% , अंजुमन हायस्कूल गोंडघर ९६.४७%, सुरैया अली कौचाली ९६.१५ % . आर्टस आणि कॉमर्स कॉलेज, मेंदडी ७७.४१ % असा लागला.या वर्षी सुद्धा तालुक्यांत मुलींनीच बाजी मारल्याचे निकालावरून स्पष्ट होते. यामध्ये न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा वाणिज्य शाखेतून हर्षद पांडुरंग महागांवकर प्रथम (८५%), पाखड विकी संतोष द्वितीय (७८.३१%), सलोनी शंकर नाक्ती तृतीय (७७%),कला शाखेतून प्रथम राजू लक्ष्मण आंबेकर (७०.८३%), दुसरा वैशाली नामदेव नाक्ती (६२.६७%),तृतीय कल्याणी कृष्णा पाटिल (६०.००%).मागास वर्गीयांमध्ये हर्षद पांडुरंग महागांवकर प्रथम (८५.००%)अंजुमन हायस्कूल मधून विज्ञान शाखेतून अब्दुल्ला मुबीन कोंडवीलकर प्रथम (७५%), दुसरा दिक्षा नितीन बोरकर (७४%), तृतीय क्रमांक सुमैया सलीम डिंगणकर (७३.३३%), वाणिज्य शाखेतून प्रथम नेहा हुमायून खान (८७.३३%),तृतीय क्रमांक सुहेरा समीर घराडे (८२.५०%),कला शाखेतून प्रथम सलिमा युसूफ परकार(८२.१७%), दुसरा जुवेरिया शकील मेमन (७८.१७%), आणि तृतीय क्रमांक समीरा अ. शकूर आगे (५५.३३)सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तहसीलदार समीर घारे, पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, गटविकास अधिकारी पोळ, गट शिक्षण आधिकारी संतोष दौंड स्कूल चेअरमन समीर बनकर, प्राचार्य प्रकाश हाके, नगराध्यक्ष असल कादिरी, नगरसेवक संजय कर्णिक नगरसेविका राखी अजय करंबे, आदि मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष भेटून कौतुक आणि शुभेच्छा दिल्या.