Home स्टोरी ११ मे रोजी माडखोल येथील रुद्र सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा गवळी समाज मेळाव्याचे...

११ मे रोजी माडखोल येथील रुद्र सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा गवळी समाज मेळाव्याचे आयोजन.

97

सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या १६ वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त शनिवारी ११ मे रोजी सकाळी १० वाजता माडखोल येथील रुद्र सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा गवळी समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याला महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे अध्यक्ष अजय बिरवटकर, सरचिटणीस उदय पाटील, उपाध्यक्ष युवराज गवळी, खजिनदार मिलिंद दर्गे, सहचिटणीस प्रकाश गवळी आदी मान्यवर उपस्थित राहून जिल्ह्यातील गवळी समाज बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सौ शीतल पाटील या स्पर्धा परीक्षा याबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

यानिमित्त खास महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार असुन यावेळी रांगोळी व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. तसेच गवळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि विविध क्षेत्रात गौरवास्पद कामगिरी बजावलेल्या गवळी समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे. सिंधुदूर्ग जिल्हयातील गवळी समाज बांधवांनी या मेळाव्याला उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.