मसुरे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेवरील एक वैध्यकीय अधिकारी वागल्याचा आरोप शिवसेनेचे आचरा विभाग प्रमुख श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी केला आहे.
मालवण तालुक्यातील पळसंब येथील मंदार सावंत याचा तीन दिवसांपूर्वी कणकवली येथे अपघात झाला.या अपघातात मंदार याच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.त्याला जिल्हा रूग्णालयात दाखल करून घेण्यात आले होते.परंतु पुढील उपचारासाठी गोवा बांबूळी येथील रूग्णालयात हलवावे अशी डॉक्टरांनी शिफारस केली.त्यानंतर १०८ रूग्णवाहिकेतून मंदार याला गोव्याला नेण्यात आले.या प्रवासात रूग्णवाहिकेसोबत असलेल्या डॉक्टरनी रूग्णासोबत फक्त दोघांनाच प्रवासात घेतले. त्यानंतर गोवा येथे पोहोचल्यावर रूग्णाच्या आई-वडिलांना कोणतेही मार्गदर्शन न करता हे डॉक्टर पुन्हा सिंधुदुर्गात निघून आले. अशा कठीण परिस्थितीत मदत न करता केवळ औपाचारिकता पूर्ण करून या डॉक्टरने रूग्णाला आणि त्याच्या नातेवाईकांना वार्यावर सोडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.अशा बेजबाबदार डॉक्टरवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिवसेनेचे आचरा विभाग प्रमुख श्री.चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे.