Home स्टोरी १०३ वर्षांचे चिटणीस काका यांची सुनील राऊळ यांनी भेट घेत ऐतिहासिक जीवनप्रवासाचा...

१०३ वर्षांचे चिटणीस काका यांची सुनील राऊळ यांनी भेट घेत ऐतिहासिक जीवनप्रवासाचा घेतला आढावा..!

158

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंवाडीतील चिटणीस वाडा येथे नुकतीच चिटणीस काकाची भेट झाली. अर्थात मी त्यांना मिलिटरी बॉइज हॉस्टेल मध्ये असल्या पासून माझ्या लहान वयापासून पाहत आलो आहे. शरीर यष्टीत फारसा फरक झालेला आजही दिसून येत नाही. खरंतर त्यांचे पूर्ण नाव .. श्री निळखंत वामन चिटणीस.

सावंतवाडी संस्थान खालसा झाले त्यावेळी शेवटचे चिटणीस म्हणून त्यांनी कारभार पाहिला होता आणि मग लोकशाही उगम झाला.  तसं मी त्यांना मिलिटरी बॉइज हॉस्टेल मध्ये असल्या पासून पाहत आलो आहे. त्या आमच्या लहान वयात त्यांना पाहिलं होत. तशीच त्यांची आजही शरीर यष्टी आहे. दोन दिवसापूर्वी त्यांचं येणं सावंतवाडीत झाले आणि म्हणून मुद्दाम त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी व १०३ वर्षाचं निरोगी आयुष्य काढल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझी पावले तिकडे वळली.  अर्थात कुटुंबीयांनी माहिती दिल्या प्रमाणे त्यांनी आजही कोणतीही गोळी घेतली नाही… हे खास वैशिष्ट..

१०३ वर्षाच्या काकाचे आशीर्वाद घेण्याचा आज योग जुळून आला. याचा ऐक मनोमन आनंद झाला आणि असच निरोगी आयुष्य सर्वांना मिळावे असे मनोमन वाटलं. चिटणीस काकांना खूप खूप प्रणाम.