ग्रामपंचायत हुमरसचे आयोजन….
कुडाळ: उद्या रविवार दिनांक २३ जुलै रोजी हुमरस (ता. कुडाळ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परबवाडी क्रमांक एक येथे दहावी बारावी व पदवीनंतर देण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची सविस्तर माहिती व स्पर्धा परीक्षांची तयारी या विषयावर सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन हुमरस ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित केले आहे. सदर शिबिरामध्ये स्पर्धा परीक्षा व दहावी बारावीनंतरचे करिअर या विषयावर तज्ज्ञ मार्गदर्शक मार्गदर्शन करणार असून यात ‘यशस्वी भव!’ या पुस्तकाचे लेखक, नीट, जेईई, एम. एच.- सीईटी, एनडीए अशा प्रकारच्या स्पर्धा परीक्षांचे तज्ज्ञ तथा परफेक्ट अकॅडेमीचे संचालक प्रा. राजाराम परब व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील हे मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी सदर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचा हुमरस पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी व कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही लाभ घ्यावा व आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून करिअरची संधी समजून घ्यावी व शिबिराला उपस्थिती द्यावी असे आवाहन हुमरस ग्रामपंचायतचे सरपंच सिताराम तेली व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी केले आहे.