Home स्पोर्ट हुंबरट प्रभागात नांदगाव केंद्राने पटकावली जनरल चॅम्पियनशिप…!

हुंबरट प्रभागात नांदगाव केंद्राने पटकावली जनरल चॅम्पियनशिप…!

186

कणकवली प्रतिनिधी: बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव  हुंबरट प्रभागाच्या वतीने केंद्रशाळा सावडाव नं.१ च्या भव्य क्रीडांगणावर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. हुंबरट प्रभागाचे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सावडाव केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, नांदगाव केंद्रप्रमुख अनघा चिपळूणकर, जानवली केंद्रप्रमुख के.एम.पवार, बिडवाडी केंद्रप्रमुख रुची कवटकर यांच्या सहयोगातून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

 या बाल कला, क्रीडा महोत्सवाचे सावडाव सरपंच आर्या वारंग आणि उपसरपंच दत्ताराम काटे यांचे हस्ते दीपप्रज्वलन आणि क्रीडाज्योत प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते  परशुराम झगडे, तसेेच सावडाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, हुंबरट प्रभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, गावातील प्रतिष्ठित नागरिक, पालक, सर्व शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी आपल्या कला, क्रीडा गुणांच्या विकासाबरोबरच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याची जिद बाळगावी आणि अधिक जलद, आधिक उंच, अधिक बुद्धिमान व्हावे असे प्रतिपादन सरपंच आर्या वारंग यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले.

उपस्थित मान्यवरांचे स्वागत  केंद्रप्रमुख सद्गुरू कुबल, अनघा चिपळूणकर, के. एम.पवार, रुची कवटकर, क्रीडाप्रमुख किसन दुखंडे, उपक्रीडाप्रमुख बजरंग मोहिते, केंद्रमुख्याध्यापिका प्रणिता लोकरे यांनी केले.

क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनानंतर क्रीडा संचलन जिल्हा क्रीडा शिष्यवृत्तीधारक हर्षली सावंत आणि इतर विद्यार्थ्यांनी केले तर सर्व स्पर्धकांना क्रीडा शपथ कार्तिकी काटे हिने देऊन सर्व स्पर्धा निकोप आणि खिलाडूवृत्तीने खेळण्याची प्रतिज्ञा दिली. सावडाव केंद्रातील शिक्षकवृंदांनी ईशस्तवन आणि स्वागतगीत सादर केले .

शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा देताना सांगितले की,जीवनात आपल्याला अनेक स्पर्धांना सामोरे जावे लागते. बालवयापासूनच आपण आपल्या अंगी असलेल्या उपजत गुणांचा विकास केला आणि यथायोग्य मार्गदर्शन घेतले तर प्रत्येक क्षेत्रात  उज्वल यश संपादन कराल. यासाठी सतत प्रयत्न, मेहनत आणि चिकाटी महत्वाची आहे. यावेळी इतर मान्यवरांनीही सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

क्रीडा महोत्सवाचे प्रास्ताविक क्रीडाप्रमुख किसन दुखंडे यांनी केले. सूत्रसंचालन राजेश कदम आणि आभार अशोक देशमुख यांनी मानले. स्पर्धेच्या आयोजनासाठी  सर्व क्रीडा पंचप्रमुख, सहाय्यक पंच तसेच सावडाव गावातील ग्रामस्थ, सावडाव शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिपक वारंग आणि सर्व सदस्य, सावडाव माजी विद्यार्थी संघ यांनी यशस्वी व्यवस्थापन केले.

विजेत्या सर्व स्पर्धकांना प्रभागाच्या वतीने सन्मानपत्र आणि सन्मानचिन्हे देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. विजेत्या सर्व स्पर्धकांना सन्मानचिन्हे निवृत बॅक अधिकारी चंद्रकांत सावंत आणि कुटुंबिय यांनी पुरस्कृत केली होती. स्पर्धा पार पाडण्यासाठी हुंबरट प्रभागातील  चारही केंद्रातील सर्व शिक्षक आणि सावडाव ग्रामस्थांनी विशेष मेहनत घेतली.

 

हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला,व ज्ञानी मी होणार स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे:

 

लहान गट:

 

कबड्डी (मुलगे) विजेता- कोळोशी हडपीड (नांदगाव केंद्र) / उपविजेता-सावडाव नं.१ (सावडाव केंद्र)

 

कबड्डी (मुली) विजेता-सावडाव नं.१ (सावडाव केंद्र) / उपविजेता-तरंदळे नं.१(जानवली केंद्र)

 

खो-खो (मुलगे)-विजेता-नांदगाव नं.१(नांदगाव केंद्र) / उपविजेता-साकेडी नं.१(जानवली)

 

खो-खो (मुली) विजेता-नांदगाव उर्दू (नांदगाव केंद्र) / उपविजेता-साकेडी नं.१(जानवली  केंद्र)

 

 

रिले (मुलगे)

 

विजेता-तरंदळे नं.१(जानवली केंद्र) / उपविजेता-नांदगाव नं.१

 

रिले (मुली)

 

विजेता-नांदगाव मधलीवाडी (नांदगाव केंद्र)

 

उपविजेता- जानवली मारुतीमंदीर (जानवली केंद्र)

 

५० मी धावणे (मुलगे)

 

प्रथम-पियुष सचिन बापार्डेकर (नांदगाव वाघाचीवाडी)

 

द्वितीय-राज योगेश कदम (कोळोशी हडपीड)

 

५०मी धावणे (मुली)

 

प्रथम-तपशिरा सिराज नावळेकर (नांदगाव तिठा)

 

द्वितीय-आर्या राजेंद्र घाडीगावकर (तरंदळे देऊळवाडी)

 

१००मी. धावणे (मुलगे)

 

प्रथम-रुद्र राजेश पुजारे (तरंदळे नं.१)

 

द्वितीय- यश हर्षल आचरेकर (बिडवाडी नं.१)

 

१००मी.धावणे (मुली)

 

प्रथम-सलोनी सुरेंद्र शेलार (नांदगाव मधलीवाडी)

 

द्वितीय-स्वरा मंगेश पालकर (भरणी नं.१)

 

लांब उडी (मुलगे)

 

प्रथम-शार्दुल अरुण माने (भरणी नं.१)

 

द्वितीय-अर्श रफिक जेठी (नांदगाव तिठा)

 

लांब उडी (मुली)

 

प्रथम-मृणाली रवींद्र जाधव (पिसेकामते गावठण)

 

द्वितीय-आर्या राजेंद्र घाडीगावकर (तरंदळे देऊळवाडी)

 

उंच उडी (मुलगे)

 

प्रथम-दुर्वांक दिपक मेस्त्री (आयनल मणेरवाडी)

 

द्वितीय-मोहम्मद उमेर मोहसीन खान (वरवडे नं.१)

 

उंच उडी (मुली)

 

प्रथम-ऋतुजा सुमंतक तांबे (बिडवाडी नं.१)

 

द्वितीय-मानसी नामदेव गिरकर (वरवडे फणसवाडी)

 

ज्ञानी मी होणार (लहान गट)

 

प्रथम-वरवडे नं.१ (बिडवाडी केंद्र)

 

द्वितीय- माईण युनिट क्र.२ (सावडाव केंद्र)

 

समूहगीत (लहान गट)

 

प्रथम-नांदगाव मधलीवाडी

 

द्वितीय-जानवली मारूती मारुतीमंदीर

 

समूहनृत्य (लहान गट)

 

प्रथम-जानवली मारुतीमंदीर

 

द्वितीय-सावडाव नं.१

 

 

मोठा गट

 

कबड्डी (मुलगे)

 

विजेता-नांदगाव नं.१

 

उपविजेता-सावडाव नं.१

 

कबड्डी (मुली)

 

विजेता-तरंदळे नं.१ (जानवली केंद्र)

 

उपविजेता-सावडाव नं.१

 

खो-खो (मुलगे)

 

विजेता-साकेडी नं.१ (जानवली केंद्र)

 

उपविजेता-नांदगाव नं.१

 

खो-खो (मुली)

 

विजेता-नांदगाव उर्दू

 

उपविजेता-बिडवाडी केंद्र

 

रिले (मोठ गट मुलगे)

 

विजेता-नांदगाव नं.१

 

उपविजेता-पिसेकामते गावठण

 

रिले (मोठा गट मुली)

 

विजेता-पिसेकामते गावठण

 

उपविजेता-नांदगाव ऊर्दू

 

१००मी.धावणे (मुलगे)

 

प्रथम-सार्थक सुरेश गुरव-(पिसेकामते गावठण

 

द्वितीय-ओम निलेश मोरजकर (नांदगाव नं.१)

 

१००मी.धावणे (मुली)

 

प्रथम-हर्षाली पांडुरंग सावंत  (सावडाव खलांत्री)

 

द्वितीय-पायल उमेश काटे (सावडाव नं.१)

 

२००मी.धावणे (मुलगे)

 

प्रथम-गोपाळ शैलेश राणे (वरवडे नं.१)

 

द्वितीय-मनोज दिलीप होळकर (जानवली मारुतीमंदीर)

 

२००मी.धावणे (मुली)

 

प्रथम-आलिया खातून तय्यब खान (नांदगाव उर्दू)

 

द्वितीय-वेदिका विलास पवार (भरणी नं.१)

 

लांब उडी (मुलगे)

 

प्रथम-आवेलिन दुमिंग म्हापसेकर (साकेडी नं.१)

 

द्वितीय-गौरव धोंडू कोकरे (सावडाव खलांत्री)

 

लांब उडी (मुली)

 

प्रथम-हर्षाली पांडुरंग सावंत (सावडाव खलांत्री)

 

द्वितीय-श्रावणी बाळकृष्ण खरात (तरंदळे नं.१)

 

उंच उडी (मुलगे)

 

प्रथम-यश अरविंद घाडीगावकर (तरंदळे नं.१)

 

द्वितीय-गोपाळ शैलेश राणे (वरवडे नं.१)

 

उंच उडी (मुली)

 

प्रथम-आर्या तुकाराम घाडीगावकर (माईण नं.१)

 

द्वितीय-ईशा संतोष मोडक (जानवली मारुतीमंदीर)

 

ज्ञानी मी होणार (मोठा गट)

 

प्रथम-  सावडाव खलांत्री

 

द्वितीय- वरवडे नं१

 

समूहगीत (मोठा गट)

 

प्रथम-नांदगाव मधलीवाडी

 

द्वितीय-सावडाव नं.१

 

समूहनृत्य (मोठा गट)

 

प्रथम-नांदगाव नं१

 

द्वितीय-जानवली मारुतीमंदीर

 

हुंबरट प्रभागस्तरीय बाल कला क्रीडा महोत्सवासाठी क्रीडा फाईल तयार करण्यासाठी गौतम जाधव, मनोज पिळणकर, भूषण हर्णे, आनंद तांबे,यांनी सहकार्य केले.

 

विजेत्या स्पर्धकांना आणि सहभागी सर्व स्पर्धक विद्यार्थ्यांना शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत ,चारही केंद्राचे केंद्रप्रमुख यांनी अभिनंदन केले. शेवटी क्रीडाप्रमुख किसन दुखंडे यांनी  आभार मानले.

 

कॅपशन:  हुंबरट प्रभाग स्तरीय बाल कला, क्रीडा व ज्ञानी मी होणार महोत्सव स्पर्धेत विजेत्यांना बक्षीस देताना शिक्षण विस्तार अधिकारी कैलास राऊत व अन्य मान्यवर